राष्ट्रगीताची स्वायत्तता

1
12

–  अरूण निग़ुडकर

   कविता ही कवीची मालमत्ता. ती राष्ट्राने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली तरी तीत बदल करण्याचा अधिकार राष्ट्राला नाही. हायकोर्टाने या प्रकरणात शिरण्याचे टाळले व सुप्रीम कोर्टाने त्यास दुजोरा दिला हे किती बरे केले!

–  अरूण निगुडकर

     राष्ट्रगीतातले कुठलेही शब्द बदलता येणार नाहीत असा योग्य निर्णय सुप्रीम कोर्टाने 1950 नंतर, परत एकदा या आठवड्यात देऊन व हायकोर्टाच्या रंजना देसाई व केतकर या न्यायाधीशांच्या खंडपीठाने तो एकमुखाने जाहीर करून वेळीच योग्य पाऊल उचलले याबद्दल दोन्ही न्यायालये व न्यायाधीश अभिनंदनास पात्र आहेत.

     मुळात ज्या कुणा व्यक्तींना ‘जनगणमन’ या राष्ट्रगीतातला सिंध हा शब्द खटकला त्याला काही तात्त्विक कारण नाही. मूळ कवी रवींद्रनाथ टागोर यांना, ते काव्य ही त्यांची स्वत:ची काव्यकृती असल्याने त्यात वाटल्यास बदल करण्याची मुभा असू शकली असती, पण ते हयात नाहीत. त्यांना हे गीत स्फुरले (1911) तेव्हा पाकिस्तानचा जन्मही झाला नव्हता!

     भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास रवींद्रनाथांचे ‘जननगणमन’ हे गीत भारताने राष्ट्रगीत म्हणून एकमुखाने निवडले, याची कारणे अनेक आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याची चाल सोपी, त्यामुळे ते कुणालाही सहजपणे म्हणता येते; तेवढीच ती अर्थवाही आहे.

     गेयता, हृदयाला हात घालणार्‍या काव्यपंक्ती या गुणांमुळे राष्ट्रगीत म्हणू लागले की भारताच्या प्रादेशिक, सांस्कृतिक जडणघडणीची ओळख सहजपणे होत जाते. भारताचा सुजाण नागरिक त्याक्षणी उभा राहून नतमस्तक होतो. एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की कवीला सिंधू वा इतर कुठलीही नदी अभिप्रेत नाही. त्यामुळे दुसर्‍या कुणाला, त्याला वाटतो तो या गीतात फेरफार करण्याचा अधिकार नाही. कोर्टाच्या कक्षेतही राष्ट्रगीतात बदल करण्यासाठी केलेला अर्ज येणार नाही. तसे करण्याचे सुप्रीम व हार्यकोर्टानी टाळले हे बरे झाले, नाही तर वेद, रामायण, महाभारत आदी जे प्राचीन वाड.मय सिंधू सरस्वती नद्यांच्या काठी निर्माण झाले ती सर्व ठिकाणे प्रादेशिक दृष्ट्या आज पाकिस्तानात आहेत, म्हणून त्यांतही बदल व्हावेत असे म्हणणार्‍या व्यक्ती पुढे येतील, कोर्टात जातील, त्यात अमूल्य वेळ व पैसा निष्कारण वाया जाऊन हाती काहीही येणार नाही. हा वायफळ खटाटोप कशासाठी?

     पाकिस्तानला सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा इतिहास व परंपरा नाही. इतिहास घडत असतो त्याला धर्म, प्रदेश यांच्या मर्यादा नसतात. रवींद्रनाथ टागोरांची स्वत:ची जागतिक ओळख आहे, ती कवी म्हणून. कला, संगीत अशा अन्य काही क्षेत्रांत त्यांनी त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जागतिक स्थान निर्माण केले आहे. ती त्यांची योग्यता व थोरवी आहे.

     प्रत्येक क्षेत्रात अशी जागतिक कीर्तीची व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, पुढेही होतील. त्यांच्या कलाकृतींना वंदन करण्याची प्रेरणा जनमानसात उत्स्फूर्त असते. मात्र त्यात ढवळाढवळ करणे म्हणजे अशा व्यक्तींच्या श्रेष्ठत्वाचा अधिक्षेप करणे होय.

अरूण निगुडकर – इमेल :  arun.nigudkara@gmail.com

{jcomments on}

अरूण निगुडकर

अरूण निगुडकर इमेल :  arun.nigudkara@gmail.com

1 COMMENT

Comments are closed.