राज्यकर्त्याने सावध असावे!

आदिनाथ हरवंदे

     “वाहने ठाण्यापासून सायनपर्यंत ठप्प झाली होती; अशा तर्‍हेने मुंबईत वाहतूक ठप्प करण्याची ताकद फक्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे!” हे उद्गार आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते छगन भुजबळ ह्यांचे.

राज्यकर्त्यांना सर्वसामान्य माणसाविषयी किती आनास्था वाटते, त्याचे हे द्योतक…

आदिनाथ हरवंदे

     “वाहने ठाण्यापासून सायनपर्यंत ठप्प झाली होती; स्तब्धपणे रांगेत उभी होती. हा मोर्चा फक्त ‘राष्ट्रवादी’चा होता. अशा तर्‍हेने मुंबईत वाहतूक ठप्प करण्याची ताकद फक्त ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये आहे!” हे उद्गार आहेत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते छगन भुजबळ ह्यांचे. राज्यकर्त्यांना सर्वसामान्य माणसाविषयी किती आनास्था वाटते, त्याचे हे द्योतक.

     राजाने रयतेची काळजी वाहायची, त्यांच्या सोईसुविधांकडे लक्ष द्यायचे असे आम्ही बालपणापासून शिकत आलो. पण प्रत्यक्षात सगळे उफराटे दिसते. शक्तिप्रदर्शनाचा हा वेगळा, विपरीत अर्थ!

     ‘राष्ट्रवादी’ची सभा होती त्याच्या अगोदरच्या दिवशी शिवशक्ती+भीमशक्ती आणि भाजप यांनी ‘महामोर्चा’ काढला. त्यांनीही त्या दिवशी वाहतुकीचा खोळंबा केला. जनतेने हा त्रास दोन दिवस सहन केला; भुजबळांना ह्यांचा विषाद वाटायला हवा होता. त्यांनी आनंद प्रकट केला!

     शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी चिपळूणला गेले होते. महाराजांनी प्रजा आणि सैन्य या दोघांची पाहणी केली. लष्कराचे कामकाज तातडीने केले. एक छावणी दळवटणे (चिपळूण) येथे कार्यरत केली. महाराज 9 मे 1674 रोजी रायगडावर परतले. महाराजांच्या मनास नव्या छावणीच्या आसपासच्या जनतेच्या सोयीगैरसोयींचा विचार होता. त्यांनी रायगडावर परतताच दळवटणे छावणीच्या अधिकार्‍यास खलिता लिहिला. त्याचा स्वैर अनुवाद:

     तुम्ही मनास ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल. असेल तोवर मिळेल. पुढचा विचार करून साठवण केली नाहीत तर पावसात उपास पडतील, घोडी मरतील. ती तुम्हीच मारलीत असे होईल. इंग्रजांची मनधरणी करावी लागेल. कुणब्यांकडे गवत, फळे, भाजी, दाणे मागाल. म्हणजे जे कुणबी जीवमात्र येऊन राहिले ते जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरतील. त्यांना वाटेल, आपण मोगल राज्यात आलो! तुमच्याबद्दल तळतळाट होईल. हे बरे जाणोन वर्तणूक करणे. ज्याला जे पाहिजे ते बाजारातून विकत आणावे. कोणावर जुलूम करू नये. तुम्ही निष्ठुर झालेत ऐसे होईल. याकारणे तपशिले लिहिणे, तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे. ज्याचा गुन्हा होईल, ज्याच्यामुळे बदनामी होईल तो वाचणार नाही!

     स्वत:च्या राज्याभिषेकाच्या तयारीच्या धामधुमीत हे पत्र लिहिणार्‍या राजाच्या मनात रयतेचे कल्याण सतत तेवत होते. वाहतूक ठप्प केल्याचा टेंभा मिरवणार्‍यांनी छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेताना सावध असावे.

आदिनाथ हरवंदे
संपर्क – 9757104560
email –
adharwande@gmail.com

{jcomments on}