Home मंथन

मंथन

‘थिंक महाराष्ट्र’ केवळ माहिती संकलन चाहत नाही तर समाजात विचारप्रवर्तनही घडवू इच्छिते. मंथन या सदरामध्‍ये अभिप्रेत आहे सद्यकालीन विषयावरील टिकाटिप्‍पणी. ‘मंथन’साठी पाठवण्याच्या लेखामध्ये माहितीचे व विचारांचे नावीन्य असावे. विविध विषयांवरील वि‍विध व्‍यक्‍तींचे लेख येथे प्रसिद्ध होतील. ते मते खणखणीत व निर्भीड रीत्या मांडलेले असावेत. ते समाजाची धारणा व्हावी ये हेतूने लिहिलेले असावेत. त्‍यावर समाजात ‘विचारमंथन’ व्‍हावे ही अपेक्षा आहे.

माकडं मजा बघतायत ! (Mahesh Keluskar’s poem symbolizes the present social circumstances)

0
जे न देखे रवी, ते देखे कवी. खरंच आहे ते. कधी कधी कवी जे लिहितो त्यातील दाहक वास्तवदर्शनाने डोळ्यांपुढे सूर्य, चंद्र तारे चमकू लागतात ! प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांनी एक कविता लिहिली आहे, ‘माकडं मजा बघत आहेत !’ समाजात जे विचित्र वातावरण तयार झालं आहे त्याचं अतिशय भेदक वर्णन त्या कवितेत आहे...

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ (Marathi books in plenty but readers are scarce)

4
वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो...

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! लेखावरील विचारचर्चा (Debate on Yeshu’s Myth for spread...

येशूख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! हा लेख 'थिंक महाराष्ट्र'वर 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला. तो अनेकांनी वाचला. त्या लेखाखाली; तसेच इमेलवर वाचकांनी प्रतिक्रियादेखील नोंदवल्या. तो लेख बहुचर्चित ठरेल अशी अपेक्षा होतीच.

पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आणि शक्यता (Integration of Subcastes – Need and Possibility)

महाराष्ट्रात निरनिराळ्या मुख्य जातींना जवळच्या अशा पोटजाती आहेत. त्या मुख्य जातींनी त्यांच्या पोटजातींच्या एकीकरणाच्या चळवळी चालवल्या पाहिजेत. जातिभेदनाशाची पहिली व्यवहार्य व परिणामकारक पायरी म्हणून व पोटजातींच्या सामाजिक गरजा भागवण्यासाठी म्हणून पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आहे !

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! (Wanted Yeshu’s Myth for spread of Christianity in...

इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा...

संभाजीराजांचा मृत्यू गुढीपाडव्यास झाला? (Did Aurangjeb Kill Sambhaji Maharaj On Auspicious GudhiPadwa Day)

संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीतील संकेतांनुसार 11 मार्च 1689 या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी, मुख्यतः विरोधक ब्राह्मणांनी आनंदाच्या भरात गुढ्या उभारल्या अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात अधुनमधून फिरतात.

सीडी देशमुखांचा मराठी बाणा (Spontaneous Lyrical Response by Finance Minister C.D. Deshmukh)

भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख (सीडी) यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वेगळे आणि अनन्य स्थान आहे. त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन जो खंबीरपणा दाखवला ते मराठी बाण्याचे खरे रूप होय असा रास्त समज झाला.

महाराष्ट्र – भारताचे ‘चौदावे रत्न’ (Maharashtra State is Born – Atre Narrates the story)

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी व्यक्तिश: आणि त्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकाने व ‘दैनिक मराठा’ यांनी अतुलनीय कामगिरी केली. अत्रे यांनी ‘नवयुग’मध्ये 1 मे 1960 रोजी लिहिलेला लेख.

अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान ! (Untouchability: Sawarkar, Gandhi And Ambedkar)

महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मान्यवर नेत्यांमध्ये जे राजकीय, सामाजिक संघर्ष झाले त्याला, राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकामधील भाषेचा आधार घेत ‘आकाशातील नक्षत्रांच्या शर्यती’ असे संबोधले जाते.

तालुक्या तालुक्यांतील नवजागरण! (Renaissance like movement in the villages of Maharashtra)

महाराष्ट्र हा प्रदेशच कर्तृत्वाचा आहे हे गेल्या आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. त्याचे कारण महाराष्ट्र हा प्रदेश संमिश्रतेचा आहे – संकराचा आहे; देश-परदेशांतून आलेल्या स्थलांतरितांचा आहे. तो महानुभावांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, शिवाजीमहाराजांचा आहे...