दिवाळीनिमित्त लेखनाचे आवाहन (Appeal to Write About Diwali)

दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंदाचा असतो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा का असेना उत्सवात त्या गोष्टी आड येत नाहीत आणि येण्यासही नकोत. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींनुसार दिवाळी त्यांना का भावते/आवडते त्याची कारणे वेगवेगळी असतात. त्या सणाचे महात्म्य वेगळे आहे. ते स्थानपरत्वे बदलते का? महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि जळगावपासूनसोलापूरपर्यंतवेगवेगळे प्रदेश आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी वेगवेगळी असते का? त्यात सूक्ष्म व ढोबळ बदल कोणते असतात? ते सारे जाणून घेण्याचे आम्ही ठरवले आहे. थिंक महाराष्ट्रच्या वतीने आर्या जोशी यांनी तशी विनंती काही लोकांना केली. पैकी कोपरगाव, लातूर आणि कोकण येथील अनुक्रमे उर्मिला गिरमे, स्नेहा वाघमारे आणि हर्षद तुळपुळे यांनी लेखन करून पाठवले. ते आम्ही येथे रोज एक याप्रमाणे प्रसिद्ध करत आहोत. आमची इच्छा अशी आहे, की महाराष्ट्रातील विविध गावांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या गाव-परिसरात दिवाळी कशी साजरी करतात? त्यामध्ये स्थानिक वैशिष्ट्ये काय असतात हे लिहावे. आम्ही ते लेखन/साहित्य थिंक महाराष्ट्रवर जरूर प्रसिद्ध करू. लेखकांनी दिवाळी सणांचे सर्वत्र साजरे होणारे जे प्रसंग आहेत त्याबाबत फार न लिहिता स्थानिक वैशिष्ट्यांवर भर द्यावा. त्या संबंधातील फोटो आणि व्हिडियोअसतील तर जरूर पाठवावे. एकाच गाव परिसरातून दोन वा अधिक लेख आले तर त्यांतील संपादकांना विशेष पसंत पडेल असा लेख प्रसिद्ध केला जाईल. लेखनास मर्यादा पाचशे शब्दांची.

नितेश शिंदे (संपादकांकरता) 9323343406/ 9892611767
info@thinkmaharashtra.com
, niteshshinde4u@gmail.com 

थिंक महाराष्ट्र

———————————————————————————————-

2 COMMENTS