ज्योती म्हापसेकरची झेप!

0
103
ज्योती म्हापसेकर
ज्योती म्हापसेकर

     मुंबईची छोटी-बुटकी दिसणारी ज्योती म्हापसेकर धाडसाने व पूर्ण विश्वासाने सहा फुटी बिल क्लिंटनसमोर उभी राहिली! ती क्लिंटन फाउंडेशनच्याच निमंत्रणावरून सध्या अमेरिकेत आहे.

     ज्योती म्हापसेकर यांच्या विचारकार्याचा सन्मान!

ज्योती म्हापसेकर      ‘मुलगी झाली हो’ या नाटकामुळे महाराष्ट्राला व जगालाही परिचित झालेल्या ज्योती म्हापसेकर यांचा पुढील प्रवास अधिकच मोठा आणि त्यांचे क्षितिज विस्तारत जाणारा आहे. म्हापसेकर यांनी ‘क्लिंटन फाउंडेशन’च्या निमंत्रणावरून अमेरिकेत पर्यावरण या विषयावर सादरीकरण केले. फाउंडेशनने म्हापसेकर यांना अमेरिकेत बोलावले ते त्यांच्या कचरा व्यवस्थापन व पर्यावरण या क्षेत्रांतील उपक्रमशील कामामुळे. फाउंडेशनने त्यांचे व्यासपीठ त्या वर्षी जगातील फक्त सहा लोकांना उपलब्ध करून दिले. त्यात ज्योती म्हापसेकर यांचा समावेश होता.

२०१० साली ज्योतीला अमेरिकेच्या अतिशय मानाच्या ‘क्लिंटन फाउंडेशन’ने सन्मानित केले     फाउंडेशन दरवर्षी एका विशिष्ट विषयात कार्य करणार्‍या जगातील निवडक व्यक्तींना बोलावून अमेरिकेतील विचारवंत व धनवंत यांच्यासमोर व्यासपीठ उपलब्ध करून देते. त्या वर्षीचा विषय होता – कचरा व्यवस्थापन व पर्यावरण. ज्योती सोबतच्या व्हिडिओत आत्मविश्वासाने व्यासपीठाला व समुदायाला सामोरी गेलेली दिसते.

     ज्योती स्त्री मुक्ती संघटनेच्या कामातून कचरावेचक महिलांच्या प्रश्नाकडे वळल्या व त्यातूनच त्यांना कचर्‍याचा व पर्यायाने पर्यावरणाचा प्रश्न ‘कळला’. त्यांच्या त्यामधील उपक्रमशीलतेमुळे त्यांनी भारतातील अशा फोरममध्ये अग्रस्थान मिळवलेच, परंतु त्या अनेक जागतिक परिषदांमध्ये व कार्यशाळांमध्ये जाऊन पोचल्या. ज्योतीला महाराष्ट्र फाउंडेशनच्या वार्षिक कार्क्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावण्यात आले होते.

     क्लिंटन फाउंडेशन अशा वेगळ्या कामास अधिक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देते. एका भारतीय व मराठी व्यक्तीच्या कार्यविचाराचा हा मोठाच सन्मान होय!

ज्‍योती म्‍हापसेकर
मोबाईल – 9867724529

आशुतोष गोडबोले

ashutoshgodbole1@gmail.com