जैतापूर की चिखलापूर ?

     जैतापूर आंदोलनाला सोमवार 18 एप्रिल रोजी हिंसक वळण लागले. त्याच रात्री ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीवर जैतापूरविषयीचा तपशीलवार रिपोर्ट दाखवण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांची दूरध्वनिवरून मुलाखत घेण्यात आली.

     त्यात गोर्‍हे यांनी ‘आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे’ असे विधान केले. त्यानंतर आयबीएनने तडक जैतापूर येथील आपल्या प्रतिनिधीस संपर्क साधला असता त्याने सांगितले, की शिवसेनेच्या काही आंदोलकांनी नाटे पोलिस ठाण्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे आंदोलक उग्र झाल्यामुळेच पोलिसांना गोळीबार करावा लागला. यातूनच शिवसेनेच्या कृतीतला विरोधाभास स्पष्ट होतो. जैतापूरात एवढा राजकीय चिखल झाला आहे, की त्यास जैतापूर न म्हणता ‘चिखलापूर’ म्हणावे लागेल.

     लोकसत्तेत दर मंगळवारी ‘वर्दीतला माणूस’ हे सदर प्रसिध्द केले जाते. पोलिसांवर नेहमीच टीका केली जाते, मात्र या सदरातून पोलिसांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन इतरांना केलेल्या मदतीच्या सत्यकथा प्रसिध्द केल्या जातात. हे एक सकारात्मक सदर असून अशी आणखी सदरे सुरू करणे गरजेचे आहे.

– अशोक जैन
पत्रकार-लेखक

दिनांक – 19/04/2011

{jcomments on}