Home चांगुलपणा

चांगुलपणा

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्मच महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व्यक्त व्हावा म्हणून झालेला आहे. त्या चांगुलपणाचे परमोच्च टोक म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे नेटवर्क व्हावे असे योजले आहे. चांगुलपणा हा रस्ता ओलांडण्यास मदत केली तरीदेखील व्यक्त होतो. चांगुलपणाच्या एवढ्या नेहमीच्या व सर्वसाधारण गोष्टी आपण येथे नमूद करणार नाही. परंतु ज्यामधून माणसाचा चांगुलपणा प्रातिनिधीक रीत्या व्यक्त होतो आणि ज्यामधून काही मूल्ये प्रकट होते अशा चांगुलपणाच्या हकिगती या दालनात प्रसिद्ध होतील. त्यांचे संकलन विविध प्रसिद्ध मजकूरातून जसे केले जाईल. तसेच ते संबंधित व्यक्तीने सच्चेपणाने केलेल्या हकिगतींमधूनही प्रकट होताना जाणवतो. तर असा मजकूर वाचकांच्या नजरेस आला तरी त्यानेही तो सच्चेपणाने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे मूळ स्रोतासह पाठवावा. मजकूर त्याची सत्यासत्यता तपासूनच प्रसिद्ध केला जाईल.

———————————————————————————————-

खोंगा खोंगा साखर

आई-मुलीचे शब्दांची गरज न भासता, एकमेकींना समजण्याचे अनुभव तसे वैश्विकच. वत्सलाबाई बापुराव भोंग यांनी आईबद्दलच्या आठवणी गप्पांतून सांगितल्या आहेत. सोप्या शब्दांतून, प्रामाणिक संवादातून त्यांच्या नात्यांमधले उमाळे, कढ, आपुलकी आणि स्नेह व्यक्त होतोय. नात्यातला ओलावा टिकवून धरणाऱ्या गोष्टींची अनुकरणीय जाणीव हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना झाल्यावाचून राहणार नाही...

जंगलचा कायदा ! अर्थात ‘जंगल का कानून’ (Laws of Jungle)

7
‘यहा जंगल का कानून नही चलेगा’, ‘जंगलराज’ किंवा कसला ‘जंगली’ माणूस आहे अशा संबोधनांनी जंगलांना आणि जंगलातील एकूणच व्यवस्थांना कोणी हिणवते, तेव्हा त्या माणसाच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. खरे तर, जंगलांइतकी कायदा आणि सुव्यवस्था माणसांच्या दुनियेत क्वचितच पाहण्यास मिळते. मुख्य म्हणजे, जंगलातील हे कायदे-कानून गेली लाखो वर्षं अव्याहतपणे पाळले जातात...

तिचं आणि माझं संवादाष्टक

आपणास मदत करणाऱ्या स्त्री-पुरुषांना गुलाम किंवा नोकर समजणे, हे माणुसकीला धरून नाही. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास हवा. त्यांच्याप्रती सद्भाव बाळगून विचारांची पातळी उंच करायला हवी. हे सांगणारा आणि प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होणारा उज्ज्वला बर्वे यांचा ‘तिचं आणि माझं संवादाष्टक’ हा लेख...

सद्भावनेचे व्यासपीठ

माणसे माणसांशी चांगुलपणाने वागत आहेत; छोटी माणसे मोठी कामे उभी करत आहेत. आजही माणसे इतरांच्या भल्यासाठी धडपडत आहेत. समाजातील भलेपणा जपू पाहत आहेत. अशा व्यक्ती समाजात दहा टक्केच असतात, परंतु त्यांचा प्रभाव एकूण समाजावर भासतो तेव्हा एकूण समाजाच्या सद्भावनेची शक्ती जाणवते, त्याच समाजशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ आहे. येथे जे जे चांगले आहे ते ते नोंदले जाईल...

वस्तीमधील उमलणारी फुले

स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. त्याचे माध्यम नाटक हे होते. नाटक मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम ठरले. त्यातून कार्यक्रमाअंती काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले...
_avinash_barve

अविनाश बर्वे यांचा मैत्रभाव

अविनाश बर्वेसरांना प्रवास हा तर आवडीचा. तोही फक्त रेल्वे किंवा लाल बसगाडी (एसटी) यांचा. कारण आता तर त्याला निम्मे तिकिट पडते, त्यांनी वयाचा अमृतमहोत्सव नुकता साजरा केला. शाळेतील त्यांच्या अनेक मित्रांचा ग्रूप दरवर्षी सहलीस...
_sandip_rane

डॉ. संदीप राणे यांचे पत्निव्रत

1
मुंबईच्या चेंबूरमधील पेस्तम सागर भागात राहणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप राणे यांच्या पत्निव्रताची ही हकिगत. मी स्वत: डॉक्टरांकडे जाऊन उत्सुकतेने ती ऐकली आणि त्यांच्या चंदनी चांगुलपणामुळे भारली गेले. माझी ती भावना वाचकांना सांगावी असे वाटले....
_dosti_ka_paigam

‘दोस्ती का पैगाम’

माझा माणसाच्या उपजत चांगुलपणावर विश्वास आहे. प्रत्येक माणूस हा चांगला असतो किंवा चांगला असण्याचा प्रयत्न कायम करत असतो. अगदी लहान मुलेसुद्धा त्यांना ‘गुड बॉय’ म्हटले जावे म्हणून इंजेक्शन न रडता घेण्यासही तयार होतात; निदान...
_new_coloum_changulpana_think_maharashtra.com

चांगुलपणा (Goodness)

0
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्मच महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व्यक्त व्हावा म्हणून झालेला आहे. त्या चांगुलपणाचे परमोच्च टोक म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व प्रज्ञा आणि प्रतिभा...