खांदेपालटानंतर लोकसत्तेचा रोख बदललेला

0
16

लोकसत्‍ता वृत्‍तपत्राचा काही दिवसांपूर्वीच खांदेपालट झाला. तत्पूर्वी लोकसत्‍तेत कॉंग्रेस, पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्‍यावर टिका येत नसे, मात्र आता यासंदर्भात बदल झालेला दिसतो. दिनांक 29 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेत ‘अर्थतज्ञांची डुलकी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेला अग्रलेख पंतप्रधानांचे कार्यालय, टूजी स्‍पेक्‍ट्रम घोटाळा यांच्‍यावर शेरेबाजी करतो. तसेच हे सर्व घडेपर्यंत सोनिया गांधी गप्‍प का होत्‍या, असा सवालही या अग्रलेखातून विचारण्‍यात आला आहे.

याच अंकात व्‍यक्तिवेध सदरामध्‍ये दिवंगत पत्रकार नारायण आठवले यांची माहिती प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. मात्र यामध्‍ये त्‍यांच्‍या प्रभंजन या झुंझार मासिकाचा उल्‍लेख नसणे खटकले. ‘विवा’ या पुरवणीत सोनाली कुलकर्णीकडून केले जाणारे लिखाण पोकळ आणि अर्थशून्‍य भासते.

अशोक जैन

पत्रकार-लेखक

दिनांक – 29/04/2011

Previous articleभ्रष्टाचारावर उतारा कायद्याच्या् चौकटीत की नितिमत्तेच्या?
Next articleसमस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.