कोरोनावर मात प्राणायामाने! (Pranayam Helps Resist Corona)

 

कोरोना माणसाच्या श्वसनक्रियेवर आघात करतो. भारतीय योग दर्शनातील प्राणायामाचा पाया श्वासोच्छवासाचे नियंत्रण यावर आधारित आहे. योगशास्त्रास जगभर मान्यता गेल्या काही दशकांत मिळू लागली होती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर योगाचा झेंडा युनोवर फडकला! मात्र कोरोनासंबंधात योगसाधनेचा विशेष उल्लेख सर्वत्र होताना जाणवला नाही. अर्थात ती चर्चा ठिकठिकाणच्या योगवर्गांत व अभ्यासगटांत विशेष अभ्यासाने होत असावी बहुधा. ‘माझी आरोग्ययात्रा’ या पुस्तकाचे लेखक, ठाणे येथील श्रीकृष्ण मराठे हे एक अभ्यासगट गेली चार वर्षे चालवत आहेत. तेथे ‘कोरोना’वर मात कशी करावी याचा बराच उहापोह वाचण्यास मिळाला. तो गट मराठे यांच्या त्याच नावाच्या पुस्तकातून निर्माण झाला.
          तसाच एक वर्ग लेखिका संध्या जोशी दादरच्या वनिता समाजात चालवतात. तो सध्या, कोरोनाकाळात तंत्रसाधने वापरून ऑनलाईन चालवला जातो. संध्या जोशी या मूळ कवितेच्या नादी, मग त्या तत्त्वज्ञानाकडे वळल्या. त्याच विषयात त्या अभ्यास करत 
आहेत. दुसरीकडे त्यांचे योगवर्गाचे हे सामाजिक कार्य चालू असते. 
 
विनिता वेल्हाणकर

मी मराठे-जोशी यांना ‘कोरोना’वर योगाची मात या विषयावर छेडले तर जोशी यांच्या शिष्य विनिता वेल्हाणकर धावून आल्या व त्यांनी एक टिपणच पाठवले. ते असे : ‘कोरोना’ची वाढ आता गुणोत्तर पद्धतीने होण्याचा धोका भेडसावू लागला आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक कसोटीचा काळ सुरू झाला आहे. शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी रोज न चुकता योग करण्याच्या सवयीचा फायदा जाणवू लागला आहे. पण मानसिक धैर्याचे काय? तेथे आमच्या योगशिक्षक संध्या जोशी आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी आमच्याकडून प्राणायाम करून घ्यायचे ठरवले. प्राणायामाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. श्वसनविकारापासून शरीराला संरक्षण मिळते. पण प्राणायाम  करणार तरी कसा, कोरोना काळात घराबाहेर पडता येत नाही. मग ऑनलाईन क्लास सुरू करण्याचे ठरले. पण सगळ्या विद्यार्थिनी म्हणजे अग्गबाई सासूबाईमधील आसावरी’. पण व्हॉटसअॅप व्हिडियो किंवा गुगल ड्युवोवरून सर्वजण एकत्र जमू लागलो. प्रथम गायत्री मंत्रापासून प्रार्थनेला सुरुवात करायची. त्यानंतर ओंकाराचा जप. त्यामुळे इकडेतिकडे धावणारे मन शांत होते आणि प्राणायामासाठी सिद्ध होते.

लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती ‘हाऊस अरेस्ट’मध्ये आहे. नैराश्य, हतबलता तर सर्वांनाच जाणवत आहे पण तरी

आपल्या जगातल्या धीराच्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. त्या नोंदण्याचा हा धावता प्रयत्न. असेच काही सांगण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा. ई-मेल – info@thinkmaharashtra.com

          आम्ही कपालभाती, अनुलोम-विलोम, भस्रिका, भ्रामरी आणि उज्जयी हे प्राणायाम करतो. या सगळ्याने शरीरातील नाड्या शुद्ध होतात. सर्व अवयवांना सुरळीत रक्तपुरवठा होतो आणि ताजेतवाने वाटू लागते. मुख्य म्हणजे फुफ्फुसांचा व्यायाम होतो आणि ती सशक्त होतात. सध्याच्या या कठीण काळात तेच तर हवे आहे. आम्ही प्राणायामाला अध्यात्माची जोड देतो. ती चित्त एकाग्रता असते. नंतर देवांचे वैद्य धन्वंतरी यांची सर्व मानवजातीसाठी प्रार्थना करतो-त्यांच्या हाताच्या कलशातील अमृताचा शिडकाव सर्व मानवजातीवर करण्यासाठी. मग होतो सोऽहमचा जप, द्वैताकडून अद्वैताकडे जाण्यासाठी. या सर्वाचा शेवट शवासनाने होतो.   
          मराठे हे योगशास्त्र बंगलोरजवळच्या प्रशांती विद्यापीठात शिकले. त्यांना योगगुरू एच.आर.नागेंद्र यांचे मार्गदर्शन लाभले. तो चमत्कार वाटावा असाच योग मराठे यांच्या आयुष्यात जुळून आला. मराठे यांना असाध्य विकार झाला होता. त्यांना सर्व तऱ्हेच्या संसर्गापासून दूर, जपून एका खोलीत राहवे लागत होते आयसोलेशनच ते. आयात केलेल्या औषधी गोळ्या-इंजेक्शने घ्यावी लागत होती. अशावेळी त्यांना नागेंद्र भेटले, मराठे यांच्या आयुष्यात फरक पडला. ते बंगलोरहून बरे होऊन परतले. त्यांचे डॉक्टर आर.डी.लेले यांचा त्यावर विश्वासच बसेना. ती जादू बंगलोरच्या ओंकार नादसाधना व अन्य तंत्रांनी केली होती. मराठे खडखडीत बरे झाले. त्यांनी त्यांच्या स्वास्थ्याकडील प्रवासाची हकिगत ‘माझी आरोग्ययात्रा’ या नावाने लिहिली. मराठे यांनी योगमार्गाचा अभ्यास चालू ठेवला. तेच आता कधीतरी बंगलोरच्या संस्थेत व्याख्यान देण्यासाठी जातात. मराठे म्हणाले, की कोरोना रोगावर औषध निर्माण होत नाही, तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीने प्रतिकारशक्ती वाढवून त्या आजारावर मात करायची आहे. त्याकरता योगशास्त्रात उदरश्वसन हा सर्वात प्रभावी व शंभर टक्के यशाचा मार्ग सुचवला आहे.
          उदर श्वसनाच्या पाच पायऱ्या –
          पाठीवर विश्रामावस्थेत सर्व गात्रे शिथिल करून स्थिर राहिले ,की केवळ पोटाची हालचाल जाणवते. तिच्याकडे विनासायास लक्ष द्यावे व साधना करावी.
१) पोटाची हालचाल – अडथळ्याविना आणि समुद्र लाटांप्रमाणे संथ, अखंड आणि आश्वासक
२) पोटाची हालचाल आणि श्वास यांचा समन्वय – पुष्पगंध श्वसन
३) श्वास आणि विचार – शल्याशी संवाद आणि निचरा
४) श्वास आणि संवेदना – डोक्यापासून पायापर्यत श्वास आणि पायापासून डोक्यापर्यत प्रश्वास.
५) सोsहं अजपाजप – मानसिक सोsss श्वास आणि हंsssउच्छ्वास
श्वासगती एक मिनिटाला बारा श्वास. नाभीवर वजनाच्या एक टक्के जवसाची रेशमी पिशवी. 3srb हे  अॅप गुगल प्लेस्टोरवरून डाउनलोड करावे. त्यातील नॉर्मल ब्रीदिंगच्या लयीवर श्वसन करावे.उदर जवसाची पिशवी मोकळ्या हवेशीर ठिकाणी ठेवली, की चार-पाच तासात पुन: उपयोगात आणता येते. धान्य काही कारणाने खराब झाले तरच बदलण्याची आवश्यकता असते.
          मला मौज वाटते, की या विविध मार्गांचा प्रचार सध्याच्या रोगविरोधी लढ्यात होताना दिसत नाही त्याची?
विनिता वेल्हाणकर – 99676 54842 ,vineetavelhankar@gmail.com          
योगशिक्षक संध्या जोशी – 9833852379, ssjmumbai@yahoo.com
श्रीकृष्ण मराठे9930588904, skmarathe@gmail.com
दिनकर गांगल 9867118517, dinkargangal39@gmail.com

 

(दिनकर गांगलहे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

 

———————————————————————————————————-

 

‘ग्रंथाली’ने श्रीकृष्ण मराठे यांच्या ‘माझी आरोग्ययात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन २०१५ साली केले.
                                                                                                                                                                   
संध्या जोशी

7 COMMENTS

  1. खूपच माहितीपूर्ण लेख .संध्या जोशी ह्या उत्तम योगशिक्षिका आहेत .त्यांना शिकविण्याची हातोटी व तळमळ आहे .या विषयात त्यांचे सतत वाचन चालू असते .त्या योगवर्गात अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करतात .त्यांच्यामुळेच श्री श्रीकृष्ण जोशी ह्यांचे वरील पुस्तक वाचनात आले .पूस्तक वाचनानंतर श्री श्रीकृष्ण जोशी ह्यांना 2/3 वर्मीषापूर्वीच घरी बोलावले होते .त्यांनी तेव्हा आमच्या परिवारातील सदस्यांना मार्गदर्शन केले होते.खरोखरच औषधे घेण्यास लागू नयेत त्यासाठी योगासने व प्राणायाम अत्यंत आवश्यकच आहे .

  2. खरंच आहे. मी बर्याच वर्षांपासून प्राणायाम करते आहे. मला अजून तरी कोणतेही औषध घ्यायला लागत नाही. माझे वय आता 64 आहे.