कोरोनाला उःशाप आहे! (There is a curse on corona!)

1
14

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांचा ‘करोना’ संबंधीचा लेख रविवारच्या ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो तुम्ही सोबतच्या लिंकवरून वाचू शकता

जगातील सगळी माणसं आज हळहळतायत, काय करून ठेवलंय माणसानं माणसाच्या आयुष्याचं! इटालियन लेखिका फ्रान्सिस्का मेलिन्स्की हिचं मुक्ता बर्वेच्या आवाजातलं, सर्वत्र व्हायरल झालेलं पत्र ऐकलंत ना! ती सांगत्ये-आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात! 

 

कोरोना हा मानवी चुकांना मिळालेला शाप असेल, तर त्याला उःशापदेखील आहे. कारण मानवजातीला त्रास देणारा हा विषाणू विज्ञानानं शोधून काढला, त्याला शत्रुपक्षात टाकलं. तेच विज्ञान त्यावर जालीम इलाजही सुचवील. तोवर पथ्य पाळणं एवढंच माणसाच्या हाती आहे.
नितेश शिंदे 9323343406 info@thinkmaharashtra.com
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

———————————————————————————————————————–
 

Previous articleसरोज जोशी – फिदा स्वतःवर! (Tribute to Saroj Joshi, Poet)
Next articleकोरोना – चीनची मात; भारतास संधी! (Corona- India’s Opportunity)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. मला वाटतं नुसतं विज्ञानच नाही कदाचित निसर्ग सुद्धा याला थांबवण्यासाठी काही चमत्कार घडवेल हे दिवास्वप्न नाही तर एखाद्या प्रदेशातील अति उष्णता अति थंडी किंवा काहीतरी वातावरणात असा बदल होईल की ज्याच्या मध्ये हा विषाणू टिकणं कठीण जाईल आणि जगभर असा हा करूना विषाणू पूर्णपणे गायब होईल अशी सुद्धा एक शक्यता आहे मदर नेचर जी आहे ती पण याला नाहीसे करील..Because nothing is constant.. Sandhya Joshi