Home कला
कला
दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)
दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली...
दापोलीतील साहित्यजीवन
‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. तेथील तरुण वर्ग मुंबई-पुण्याकडे ‘करिअर’साठी जात आहे. असे असतानाही दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या तरुणांच्या मनातून जात नाही. ती ते त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यांचा आढावा...
मॅक्सिन बर्नसन – शिक्षणातील दीपस्तंभ (Maxine Berntsen – Life long efforts for model school)
मॅक्सिन बर्नसन या नॉर्वेजिअन अमेरिकन विदुषी तरुण वयात भारतात आल्या आणि भारताच्याच झाल्या. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम मोलाचे समजले जाते. मॅक्सिन बर्नसन या त्यांच्या पीएच डी च्या अभ्यासाची तयारी करत असताना त्यांच्या कॉलेजमध्ये इरावती कर्वे व्याख्यान दौऱ्यावर आल्या होत्या. इरावती कर्वे यांनी त्यांना फलटणला जाण्यास सुचवले. तेथे त्यांची मुलगी जाई निंबकर राहत असे. म्हणून त्या फलटण या गावी 1966 साली आल्या. तीच मॅक्सिनबाईंची कार्यभूमीही झाली !
अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....
अर्पण करू…
आसावरी काकडे यांची आत्मचिंतनात्मक कविता वाचली. इंग्रजी साहित्यामध्ये ‘ड्रॅमॅटिक मोनोलॉग’ नावाचा एक काव्यप्रकार आहे. तो नावाप्रमाणेच, स्वतःशी केलेला संवाद असतो. त्याच्या सादरीकरणात शेजारी श्रोता आहे, हे गृहीत धरलेले असते. श्रोता बोलणाऱ्या व्यक्तीचे विचार ऐकत असतो, पण त्यावर प्रतिक्रिया मात्र देत नाही किंबहुना स्वतः बोलत नाही. अगदी त्याचप्रमाणे, आसावरी काकडे यांच्या ‘अर्पण करू’ या कवितेतली व्यक्ती समाजमनाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दिसते...
विवेकचूडामणि – मराठी अनुवाद घडला हे खरे !
मी कवी किंवा साहित्यिक म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या वाङ्मयाशी जोडला जावा असे ‘पुण्य’ घडल्याचे आठवत नाही. पण खरोखरीच, आले देवाजीच्या मना... तसे घडले आणि माझ्या हातून ‘विवेकचुडामणि’ या महान संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद होऊन गेला ! एकदा गंमत घडली ! माझी गजल ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून गझल गायक भीमराव पांचाळे यांनी लिहिले, की ती कविता ‘व्योमगंगा वृत्ता’त आहे. तोपर्यंत त्या नावाचे वृत्त आहे, हे माझ्या गावीही नव्हते ...
सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...
पाखरा – जव्हार पाड्याच्या मुलांचे पुस्तक !
पालघर जिल्ह्याच्या जव्हार पाडा भागातील मुलांनी पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांना दिसणाऱ्या पक्ष्यांविषयी तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले गेले आहे. त्यांची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत...
वस्तीमधील उमलणारी फुले
स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. त्याचे माध्यम नाटक हे होते. नाटक मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम ठरले. त्यातून कार्यक्रमाअंती काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले...
मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान
अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...