‘इंग्रजी माध्यमाचीच समाजाला गरज’ हे चित्र भ्रामक

     मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शाळा मागणारे लोक हे प्रत्‍यक्ष राजकारणी किंवा त्‍यांचे अप्रत्‍यक्ष पाठीराखे आहेत. त्‍यामुळे इंग्रजी माध्‍यमाचीच समाजाला ….


      मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शाळा मागणारे लोक हे प्रत्‍यक्ष राजकारणी किंवा त्‍यांचे अप्रत्‍यक्ष पाठीराखे आहेत. त्‍यामुळे इंग्रजी माध्‍यमाचीच समाजाला गरज असल्‍याचे भ्रामक चित्र निर्माण करण्‍यात त्‍यांना यश येत आहे. एप्रिल महिन्‍यात शिक्षण मंत्र्यांसोबत मराठी शाळांच्‍या मान्‍यतेच्‍या प्रश्‍नावर झालेल्‍या चर्चेच्‍या वेळी मराठी शाळांमधून चांगले इंग्रजी आणि तंत्रज्ञान शिकवण्‍याची सोय सरकारने उपलब्‍ध करून दिली असती, तर मराठी शाळांवर हे संकट ओढवले नसते अशी भूमिका मराठी शाळांच्‍या अस्तित्‍वासाठी लढणा-या कार्यकर्त्‍यांकडून मांडण्‍यात आली होती. इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे या दोन वेगवेगळ्या गोष्‍टी आहेत हे आपल्‍या समाजाला; विशेषतः अभिजन वर्गाला जितक्‍या लवकर कळेल, तितके बरे!

दीपक पवार
अध्‍यक्ष, मराठी अभ्‍यास केंद्र.

दिनांक – 25.05.2011

{jcomments on}