अनोखे जाते

0
40
carasole

मंगळवेढ्यातील एक तालेवार कुटुंब म्हणजे डॉ. हरिहर पटवर्धन. ते आयुर्वेद व अॅलोपथीचे डॉक्टर आहेत. ते व त्यांचे पाच भाऊ मिळून त्यांची दोनशे एकर शेती आहे (प्रत्येकी चाळीस एकर) त्यांच्या बंधूंकडे एक अजस्र ‘जाते’ आहे. त्यात पूर्वी रोज दोन पोती (दहा क्विंटलपर्यंत) ज्वारी बैलांकरवी दळली जात असे. फोटोतील जात्‍याला डाव्‍या बाजूस दिसणा-या खोबणीमध्‍ये शिवणी अडकवली जाई आणि त्‍यास बैल जुंपण्‍यात येई. त्या जात्‍यातून तयार झालेले पीठ व ताकाचा डेरा दामाजी मंदिराच्या आवारात ठेवला जात असे. गरजू भाविक गरजेप्रमाणे ते पीठ घेत. भाकऱ्या करून ताक पीत असत.

– राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे

About Post Author