Member for

1 year 11 months

प्रा. डॉ. राम नेमाडे यांनी एम्ए, बीएड्, डी. लिट्(मानद) या पदवी त्यांनी मिळवल्या आहेत. रा.भा.पंडित सिनी. एच.एस.एस्. यात त्यांनी यश संपादन केले. प्रा.डॉ. राम नेमाडे हे सध्या एकोणऐंशी वर्षांचे आहेत. त्यांनी शाळा-कॉलेजमधून मराठी व हिंदी विषयांचे अध्यापन केले आहे. त्यांची मराठी व हिंदी विषयावर पाठ्यपुस्तकांना पुरक व्याकरण व लेखनाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणी व दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमातून त्यांनी सहभाग घेतला आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर व्याख्याने ते देत असतात. 'ऋतुगंध' व 'हिरवा चाफा ' हे दोन कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत. त्यांचे नियतकालिके, मासिके व दिवाळी अंकांमधून कथा लेख प्रकाशित होत असतात. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न म्हणून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना ते आर्थिक मदत करतात. नवोदित साहित्यिकांच्या साहित्य प्रकाशनासाठी ते आवश्यक सहाय्य करतात.

लेखकाचा दूरध्वनी

7045658866