Member for

4 years 10 months

डॉ. सोपान शेंडे यांचा जन्म चांदा येथील. ते पुण्यामधील एस.पी. क़ॉलेजमध्ये 1990 पासून इतिहास हा विषय शिकवत असत. सध्या ते तेथे सहाय्यक प्राध्यापक आणि इतिहास विभाग प्रमुख आहेत. त्यांनी 1997-98 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मशताब्दी निमित्त शंभर व्याख्यानांचा संकल्प पूर्ण केला. त्‍यांनी 1996- 2003 या काळात 'राष्ट्रीय सेवा योजने'चे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले. त्यांनी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी 1996-97 साली 'अभिनव भाऊबीज' या उपक्रमाचे आयोजन केले होते. सोपान शेंडे हे व्‍याख्‍याते असून त्‍यांनी अनेक प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत. त्यांचे इतिहासातील दुर्लक्षीत विषयांवर संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहे. ते 'माझी प्रबोधनाची कविता' हा स्वरचित्र कविता सादरीकरणाचा कार्यक्रम करतात. त्यांनी 'विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली' यांच्या सहाय्याने 'पुणे शहरातील पुतळ्यांचा इतिहास' हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सध्या ते 'वंशावळीच्या आधारे सामान्यांचा इतिहास' या प्रकल्पावर काम करत आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

8983370495