Member for

5 years 3 months

डॉ. कांचनगंगा गंधे या पुण्‍याच्‍या राहणा-या. त्‍या वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या प्राध्‍यापक म्‍हणून 2010 साली निवृत्‍त झाल्‍या. त्‍यांना शिक्षण क्षेत्रात सत्तावीस वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांनी पुणे विद्यापीठासारख्‍या वेगवेगळ्या शिक्षण संस्‍थांसोबत कामे केली. त्‍यांचे एकूण चोवीस शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. डॉ. गंधे यांनी विविध नियतकालिकांमध्‍ये वन्‍यसंपत्तीबाबत पाचशे पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. यासंबंधात त्यांनी लिहिलेली 'वृक्षवल्‍ली आम्‍हा...', 'गणेश पत्री', 'आपले वृक्ष आपली संपत्ती', 'आरोग्‍यासाठी चार्तुमास' आणि 'पर्यावरण आणि वने' ही पाच पुस्‍तके प्रसिद्ध झाली आहेत. यासोबत त्‍यांनी वनस्‍पती आणि त्‍यांचे महत्त्व या अनुषंगाने 'आकाशवाणी'वर शंभराहून जास्‍त कार्यक्रम केले आहेत. या विषयासंबंधात त्‍यांचा टि.व्‍ही.वरील 'सुंदर माझे घर' आणि 'रानभाज्‍या आणि त्‍यांचे उपयोग' या कार्यक्रमांमध्‍ये सहभाग होता.

लेखकाचा दूरध्वनी

88 05 985944