प्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना


छंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक डॉ. प्रकाश कामत यांनी आपल्या छंदातून सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनोख्या छंदाची दखल घेऊन 2001 साली ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्डस् ’ने त्यांचे नाव विक्रमांच्या यादीत समाविष्ट केले आहे.

डॉ. कामत यांना लहानपणापासून संगीताबद्दल ओढ होती. त्यांनी विद्यार्थिदशेत गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या शास्त्रीय गायनाच्या तीन परीक्षा दिल्या. घरातही, वडीलांच्या आवडीमुळे नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिका कानावर पडत. महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाल्यावर शास्त्रीय गायनाचे शिक्षण थांबले, परंतु तोपर्यंत शास्त्रीय आणि नाट्यसंगीतापर्यंत मर्यादित असलेल्या आवडीला, काही मित्रांच्या प्रभावातून वेगळे आयाम मिळाले. डॉ. कामत जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे चाहते बनले. मात्र ही भूक भागवायला त्यावेळी मुबलक साधनसामुग्री उपलब्ध नव्हती. त्यांच्याकडे असलेले एकमेव साधन म्हणजे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांनी बक्षीस दिलेला रेडिओ! जुन्या हिंदी गाण्यांचा दुर्मीळ खजिना म्हणजे रेडिओ सिलोन! सिलोनवरून रात्री प्रसारित होणारा 'हमेशा जवाँ गीत' हा कार्यक्रम म्हणजे जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांना पर्वणीच असायची! मात्र कामत यांचे तेवढ्यावर समाधान होत नव्हते. ही अवीट गोडीची गाणी आपल्याला हवी तेव्हा, हवी ती आणि हव्या तितक्या वेळा ऐकता यावी यासाठी या कार्यक्रमातली गाणी त्यांनी ध्वनिमुद्रित करून ठेवली. अशा प्रकारे, हळुहळू त्यांच्याकडे जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या २४७५ कॅसेट्स आणि स्पूल्सचा संग्रह जमा झाला. डॉ. कामत 1963-64 सालापासून या ध्‍वनिमुद्रिका जमवत आहेत.

सुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट


परमार्थाची सुरावट सुभाष शहा यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि ‘बासरी वाजवू का?’ असे विचारतात. त्यांचे वसाहतींमध्ये जाऊन असे तासाभराचे कार्यक्रम करण्यामागे धोरण आहे. ते म्हणतात, की सर्व माणसे हल्ली फार गडबडीत असतात; कोणाला म्हणून निवांतपणा नसतो. त्यामुळे सोसायट्यांत बाहेर क़ोणी येत नाही, एकमेकांना कोणी भेटत नाही. मी तेथे सुटीच्या दिवशी जातो, तासभर बासरी वाजवतो, गप्पा मारतो. बासरीने आल्हाद तयार होतो. चार माणसे जमतात-संवाद सुरू होतो.
 

उपजीविका माझी जशी
जांभळी पेन्सील आहे
जीविका माझी आता
बासरीचा सूर आहे!

या चार ओळी सुभाष शहा यांचा सध्याचा मूड व्यक्त करतात. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटण्ट, परंतु सध्या बासरीने झपाटले आहेत आणि त्यांची ओळख झाल्यापासून, ते क्षणार्धात बासरीचे सूर काढू लागतात, अर्थात ऐकणार्‍याची इच्छा असेल तर... त्यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि ‘बासरी वाजवू का?’ असे विचारतात. त्यांचे वसाहतींमध्ये जाऊन असे तासाभराचे कार्यक्रम करण्यामागे धोरण आहे. ते म्हणतात, की सर्व माणसे हल्ली फार गडबडीत असतात; कोणाला म्हणून निवांतपणा नसतो. त्यामुळे सोसायट्यांत बाहेर क़ोणी येत नाही, एकमेकांना कोणी भेटत नाही. मी तेथे सुटीच्या दिवशी जातो, तासभर बासरी वाजवतो, गप्पा मारतो. बासरीने आल्हाद तयार होतो. चार माणसे जमतात-संवाद सुरू होतो.

सुभाष शहा ७२ वर्षाचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवाचे भांडार मोठे आहे. ते त्या पोतडीतून एकेक गोष्ट काढून श्रोत्यांपुढे ठेवू शकतात. पण त्यांना अपेक्षा आहे ती रहिवाशांनी एकत्र येण्याची, नव-नव्या कल्पना राबवण्याची.

पद्मजा फेणाणी-जोगळेकर - जीवन-एक मैफल!

अज्ञात 24/06/2010

कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे!

पद्मजा फेणाणी-जोगळेकरपद्मजाचा जन्म गळ्यात देवदत्त स्वर घेऊन कलावंत कुटुंबात झाला. वडील शंकरराव- कमर्शिअल आर्टिस्ट, स्क्रेपरबोर्ड आर्टिस्ट आणि संगीतप्रेमी. आई शैलजा-हस्तकलानिपुण. थोरली बहीण उषा-संगीत, नृत्य आणि चित्रकलाप्रेमी. भाऊ विनायक - तबलावादक. पद्मजा नामवंत बालमोहन विद्यामंदिरातून शालांत परीक्षा आणि रुपारेल महाविद्यालयातून बारावी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली होती. ती सोफिया महाविद्यालयातून मायक्रोबॉयोलॉजी हा विषय घेऊन बी.एस्सी. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली. पद्मजाने पॅथॉलॉजिस्ट व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची त्यावेळी अपेक्षा होती.

परंतु पद्मजा पॅथॉलॉजिस्ट न होता प्रथम श्रेणीची आंतरराष्ट्रीय कीर्तीची गायिका झाली! एका दिवसात किंवा एका रात्रीत कुणीही 'मोठा' होत नाही! कौटुंबिक संस्कार, शाळा-महाविद्यालयातील स्नेही-सोबती-गुरू यांच्यामुळे होणारी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण,

ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजामध्ये हे सारे गुण आहेत! शिल्पकाराला मूर्ती घडवण्यास योग्य ताकदीचा दगड लाभावा लागतो. त्या दगडालाही आपल्यातून सुंदर मूर्ती निर्माण व्हावी, असे वाटावे लागते.

पद्मजाला तिच्या आयुष्यात तिला घडवणारे, प्रोत्साहन देणारे हात लाभले. योग्य वेळी योग्य गुरूची भेट ही योगायोगाचीच बाब! पद्मजा ही तशी नशीबवान!