ना.वा. टिळक - फुलांमुलांचे कवी (Narayan Vaman Tilak)
नारायण वामन टिळक हे फुलांमुलांचे कवी म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाचे आणि त्यांची रचना, ‘अभंगांजली’चेही 2019 हे शताब्दी वर्ष आहे. ते ‘नाना’ या नावाने परिचित होते. ते कमालीचे मातृभक्त होते. त्यांना त्यांच्या मनमानी वडिलांचा राग येई. त्यांच्या आईजवळ नीतिकथांचे एक पुस्तक होते. ते त्यांच्या शीघ्रकोपी वडिलांनी रागाच्या भरात जाळून टाकले. तेव्हा, छोट्या नारायणाने त्यांची चुन्याची डबी विहिरीत फेकून दिली होती!