संमेलन अध्यक्ष वेगळ्या नजरेतून
सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम 'कॅरिकेचरिस्ट' ही आहेत. त्यांनी पुल व गांधी यांची रेखाटलेली कॅरिकेचर्स खूप प्रसिद्धी पावली. त्यांना पुस्तकातही स्थान मिळाले.