बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!


बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत बाळ भैरवनाथ व जोगेश्वरी यांचे लग्न यथासांग होते. बाळभैरवनाथांच्‍या त्‍या देवस्‍थानाचे एक वैशिष्‍ट्य आहे. गावच्‍या परंपरेनुसार गुढीपाडव्‍याला तेथील ग्रामस्थ एका विशिष्ट पद्धतीने येणाऱ्या हवामानाचा-पाऊसपाण्याचा अंदाज बांधतात. त्याला एक वेगळेच पंचांगवाचन म्हणता येईल.

गुढीपाडवा - हिंदू नववर्षाचा आरंभ

अज्ञात 21/03/2015

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.

पाडवा हा सण का साजरा केला जातो याबाबतच्या वेगवेगळ्या उपपत्तीत आहेत. ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केले आणि कालगणना सुरू झाली असे ब्रम्हपुराणात म्हटले आहे. ती चैत्र शुद्ध प्रतिपदेची सकाळ मानतात. अशा तऱ्हेने पाडवा हा जगाच्या उत्पत्तीचा दिवस ठरतो. त्या दिवशी श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येत परत आले असेही मानले जाते. त्या वेळी अयोध्यावासीयांनी घरांना तोरणे लावून, विजयपताका अर्थात गुढ्या उभारून आनंद साजरा केला. म्हणून भारतीय लोक त्यांच्या निवासस्थानी गुढ्या उभारून त्या दिवसाचे व नववर्षाचे स्वागत करतात.

आणखी एक कथा अशी आहे, की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यांमध्य प्राण फुंकून त्यांच्या साह्याने शकांचा पराभव केला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. शालिवाहनाने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली - शालिवाहनाच्या चमत्काराचा असा तर्कसुसंगत अर्थ काढता येतो. त्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना ‘शालिवाहन शक’ अशी सुरू करण्यात आली. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिप्रदा! ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते ‘शक’ अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. अजूनही शालिवाहन शकानुसार भारतीय कालगणना होते. त्यानुसार हिंदू पंचांगे तयार केली जातात. भारतातील काही प्रांतांत कार्तिक प्रतिपदेला, तर काही ठिकाणी मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानले जात असले तरी ‘शालिवाहन शक’ मात्र सर्वदूर रूढ आहे.

गुढीपाडवा - परंपरा आणि आधुनिकता

अज्ञात 21/03/2015

गुढीपाडवा आणि शोभायात्रा या दोन गोष्‍टींचे समीकरण गेल्या सतरा वर्षांत अधिकाधिक बळकट होत गेलेले दिसते. पूर्वी ठाणे-डोबिवली परिसरातून काढल्‍या जाणा-या शोभायात्रा राज्‍याच्‍या अनेक भागांमध्‍ये प्रकट होऊ लागल्या आहेत. शोभायात्रा हे लोकांच्‍या एकत्र येण्‍याचे, आनंद साजरा करण्‍याचे नवे सांस्‍कृतिक निमित्‍त होऊन गेले आहे. काहीशा याच विचाराने लोकमान्‍य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. त्‍यामागे लोकांना एकत्र आणून काही गोष्‍टी साधण्‍याचा हेतू होता. तसा हेतू या शोभायात्रांना नाही. म्‍हणून शोभायात्रांच्‍या निमित्‍ताने लोक एकत्र आल्‍यानंतर त्‍यातून 'काही घडण्‍याची' चिन्‍हे नाहीत. टिळकांच्‍या गणेशोत्सवाची आज जी अवस्‍था आहे तीच शोभायात्रांची होत चाललेली दिसते. कृतीमधला हेतू हरवला की त्‍यातला अर्थही हरपतो. दरवर्षी होणारी ही सांस्‍कृतिक घडामोड सार्वजनिक स्‍तरावरचा दुसरा सत्‍यनारायण होण्‍याच्‍या मार्गावर आहे. याबद्दलची दोन मते वाचकांसमोर मांडत आहोत. शोभायात्रांची सुरुवात करणारे डोंबिवलीचे आबासाहेब पटवारी यांची 'दैनिक सकाळ'मध्‍ये प्रसिद्ध झालेली मुलाखत आणि 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे मुख्‍य संपादक दिनकर गांंगल यांनी लिहिलेल्‍या 'स्‍क्रीन इझ द वर्ल्‍ड' या पुस्‍तकातील निवडक उतारा येथे उद्धृत करत आहोत.

नववर्ष स्वागतयात्रा सर्वधर्मीय व्हायला हवी!

 

डोंबिवली शहरात सतरा वर्षांपूर्वी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतयात्रा निघाली आणि नंतर सगळीकडेच या यात्रा सुरू झाल्या. या स्वागतयात्रेत दिवसेंदिवस बदल होत गेले. ती काळाप्रमाणे बदलायलाच हवी, असे तिचे प्रवर्तक आबासाहेब पटवारी यांना वाटते. कसे बदलायला हवे तिचे स्वरूप? पटवारी यांच्याशी संवाद...

नववर्ष स्वागत शोभायात्रेत या वर्षी काय वेगळेपण आहे?