सट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा
बसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची ती पुस्तके बेलिलियस रोड, हावडा 711 101 पश्चिम बंगाल या पत्त्यावरून येतात. त्यात पूर्ण वर्षाचे तक्ते उपलब्ध असतात. तो खेळ कसा खेळावा याचीही पुस्तके असत. मी तो बाजार सुरू कसा झाला याची रत्नागिरी परिसरात फिरून माहिती घेतली; https:/ sattamatkai.net ही वेबसाईट पाहिली आणि मला त्यातील खास भाषेचा परिचय झाला...
पहिल्यांदा कॉटन बाजार असायचा. कापसाचे दर फुटायचे. त्या दरानुसार ‘फिगर/ आकडा’ ओपन व्हायचा. तो बाजार नंतर पत्त्यांवरून सुरू झाला. भारतात मटका स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे असे जुनेजाणते लोक सांगतात. मडक्याच्या आत चिठ्या टाकून त्यातून नंबर काढला जात असे. मटक्याचा प्रयोग होई म्हणून मटका असे त्या खेळाचे नाव पडले. मटकाबाजार डे मधुर, नाईट मधुर, डे मिलन, वरळी बाजार, टाईम बाजार, बालाजी किंग डे, तारा मुंबई डे, राजधानी डे अशा नावांनी दिवसरात्र उपलब्ध आहेत. विशेषतः जे खास शब्द कल्याण व मुंबई बाजारांत मिळाले त्यांची माहिती अशी-