अहिराणी : आक्षेपांचे निरसन
अनिलकुमार भाटे यांचे माझे भाषणावरील आक्षेप ‘थिंक महाराष्ट्र’ वर वाचले. माझ्या भाषणाशी या आक्षेपांचा थेट संबंध नाही. माझ्या भाषणाशी या आक्षेपाचा थेट संबंध नाही.
१. भाटे यांना माझे अहिराणी भाषण समजले. समजायला अडचण आली नाही म्हणून बरे वाटले. अहिराणी ढोल आणि माझी अहिराणी पुस्तकेसुद्धा महाराष्ट्रभर आणि राज्याबाहेरही चोखंदळ मराठी वाचकांना समजतात. त्याचा उल्लेख भाषणात सुरुवातीलाच आला आहे.
२. नाशिकच्या मराठी लोकांनाही माझे अहिराणी भाषण समजावे म्हणून मी भाषणाची रचना सोप्या अहिराणीत केली होती. जशी सोपी मराठी, अवघड मराठी; अवघड हिंदी; सोपी इंग्रजी, अवघड इंग्रजी; अशी आपण वर्गवारी करतो त्या अर्थाने सुलभ अहिराणी ही संज्ञा मी येथे वापरत आहे.
उदाहरणार्थ राम गणेश गडकरी यांच्या ‘भावबंधन’ नाटकातील भाषा मराठी आणि ग.दि. माडगूळकर यांच्या कवितेची भाषाही मराठी. एक समजायला कठीण. दुसरी समजायला सोपी.