दुर्वा
दुर्वा ही एक तृण वनस्पती आहे. हे तृण पवित्र समजतात. ऋग्वेदात त्याचे उल्लेख मिळतात. (ऋ. 10.142.8., 10.134.5) दुर्वांना तैतरीय ‘मुलांच्या वाढीप्रमाणे आमच्या वंशाची वाढ कर’ असे संहितेत प्रार्थिले आहे. (4.2.9.2)
दुर्वा ह्या देवपूजेमध्ये वापरल्या जातात; खास करून गणपती पूजेमध्ये. गणपतीला दुर्वा का वाहतो? त्याचे एक उत्तर आहे - राज्यात दुर्वांची भरपूर कुरणे राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळचे संपूर्ण जीवनचक्रच हिरव्या गवतावर निर्भर होते. भाद्रपदात रानावनात सर्वत्र हिरव्यागार दुर्वा दिसून येतात. पुढील पावसाळ्यापर्यंत दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे; गणाध्यक्ष अर्थात गणप्रमुखाने शत्रूंपासून त्या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा. जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो सर्व कार्यांत यशस्वी होतो असे गणपती अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत म्हटले आहे.
गणपतीला दुर्वा वाहताना एकवीस नामांचा उच्चार केला जातो, तो पुढीलप्रमाणे - ॐ गणाधिषाय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ अभयप्रदाय नमः ॐ एकदंताय नमः ॐ इभवक्राय नमः ॐ मूषक वाहनाय नमः ॐ विनायकाय नमः ॐ इशपुत्राय नमः ॐ सर्वसिध्दीप्रदायकाय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ अघनाशकाय नमः ॐ विघ्नविध्वंसकर्मेंनमः ॐ विश्ववंधाय नमः ॐ अमरेश्वराय नमःॐ गजवक्त्राय नमः ॐ नागयद्नोपवितीनेनमः ॐ भालचंद्राय नमः ॐ परशुधारणे नमः ॐ विगघ्नाधिपाय नमः ॐ सर्वविद्याप्रदायकाय नमः