सांगली

सांगली

मतिमंद मुलांना ‘नवजीवन’ (शाळा)

‘नवजीवन शाळा’ सांगलीमध्ये मतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी गेली तीस वर्षें कार्यरत आहे. मतिमंदांसाठी शिक्षण असते याबाबत समाज अनभिज्ञ होता. अशा काळात संस्थेची स्थापना झाली. मतिमंद मूल शिकून करणार काय, असा विचार करणा-या समाजात मतिमंदांच्या शिक्षणाचे बीज रोवणे हे खडतर आव्हान होते. ते आव्हान मानसशास्त्राच्या प्राध्यापक रेवती हातकणंगलेकर यांनी स्वीकारले. त्यांनी समाजाने दुर्लक्षलेल्या मतिमंदांच्या जीवनात त्यांच्यासाठी खास शाळा सुरू करून आशेचा किरण दाखवला. पालक त्यांचे मतिमंद मूल घरापासून बाजूला जातेय, त्याच्यामुळे होणारा मानसिक त्रास थोडा कमी होईल म्हणून क्रमश:

नरसिंहपूरचे ज्वाला नृसिंह मंदिर

सांगली जिल्ह्याच्या वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात नरसिंहपूर हे श्री नृसिंहाचे स्थान आहे. इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. तेथे श्री नृसिंहाचे मंदिर भुयारामध्ये आहे. मंदिर पुरातन असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. बहे गावी कृष्णा नदीवर पूल आहे. बहे गावी कृष्णा नदी दोन प्रवाहांनी वाहते, त्यामुळे मध्ये बेट तयार झाले आहे. त्या बेटावर रामदासस्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. कथा अशी, की श्रीराम दंडकारण्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आले व दैनंदिन आन्हिके करण्यासाठी बेटावर बसले असताना कृष्णा नदीला पूर आला. त्यावेळी मारुतिरायांनी दोन्ही हात क्रमश:

मांगरुळ गावची श्रीचिंचेश्वराची...

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील मांगरूळ गावात पर्वतरांगांच्या कुशीत, अगदी उंच डोंगरावर श्रीचिंचेश्वर देवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ तर मागील बाजूस वठलेला वटवृक्ष आहे. शिवाय बाजूला दाट वनराईही आहे. मंदिरापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी वारणा नदी आहे. ग्रामस्थ आणि चिंचेश्वराच्या भक्तांनी मिळून उंच टेकडीवर असलेल्या त्‍या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या गाभा-यात चिंचेश्वराची मूर्ती आहे. आजही त्‍या देवाची आख्यायिका लोक मोठ्या भक्तिभावाने सांगतात. क्रमश:

सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य

सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार परिसर, पक्ष्यांचे कुजन, डोंगरांमधून वाहणारे लहानमोठे झरे असे निसर्गरम्य वातावरण सागरेश्वर परिसरात अनुभवता येते. तेथे सातशे-आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह आहे. त्यात सुमारे एकावन्न मंदिरे असून त्यापैकी सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर आहे. तेथे समुद्राच्या कृपेने गंगा वास्‍तव्‍य करते अशी धारणा आहे. त्यावरूनच त्या परिसरास सागरेश्व‍र असे नाव पडले. सागरेश्वर क्रमश:

देवानंद लोंढे - शून्यातून कोटी,...

हिंगणगाव या छोट्याशा खेडे (तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली ) गावाचे नाव उद्योगक्षेत्रात गाजत आहे ते देवानंद लोंढे या तरुण उद्योजकामुळे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताना त्याला मिलिंद सगरे हा मित्र मिळाला. त्यानंतर गावातीलच ‘नारायण तातोबा सगरे हायस्कूल’ येथे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरमधील गारगोटी येथील ‘आय.सी.आय.’ (इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीयरिंग) मध्ये प्रवेश मिळाला. तेथील वसतिगृहात राहण्या-जेवणाचीही सोय झाली. देवानंद नाशिक येथे नोकरी करत असताना त्याची तेथे स्नेहल या मराठा क्रमश:

कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!

 भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांति‍पर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे.”    नद्यांचे महत्त्व महाभारत काळापासून विशद केले जात असले, तरी नद्यांबाबत आपण आणि आपले राज्यकर्ते म्हणावे तेवढे जागरूक नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहणा-या माणगंगा या ऐतिहासिक नदीचे देता येईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली , सोलापूर आणि क्रमश:

सांगलीची हळद बाजारपेठ

सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची व्यवस्था, पेवांतील हळदीची आकडेआकडी (बिल टू बिल) खरेदी-विक्री, सांगलीचा हळद वायदेबाजार, बँकांकडून हळदीचे पॉलिश अन् पावडर यांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य, त्‍या परिसरात उभारलेल्या हळद पावडर आणि पॉलिश मिल्स-वेअरहाऊस-गोडाऊन्स, वाहतूक कंपन्या, अडते, खरेदीदार आणि हमीदार व्यवस्था इत्यादी घटक सांगली हे देशभरातले हळद केंद्र बनण्यास महत्त्वपूर्ण ठरले. व्यापा-यांनी व्यवहारात ठेवलेली सचोटी आणि सत्वर क्रमश: