लातूर

लातूर     लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा आहे. आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागात असणा-या लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ७,१५७ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी, उत्तर व पूर्वेस नांदेड, पूर्वेस व आग्नेयेस बिदर (कर्नाटक), दक्षिण व पश्र्चिमेला उस्मानाबाद, वायव्येला बीड हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग व मध्य भाग बालाघाट डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या मध्यभागी मांजरा नदीचे खोरे, तर दक्षिणेकडे तेरणा नदीचे खोरे पसरलेले आहे. उत्तरेकडील प्रदेश सखल व सपाट आहे. मांजरा ही जिल्ह्यातील मुख्य नदी असून तेरणा, तावरजा, धरणी या तिच्या उपनद्या आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मन्याड, लेंडी या नद्या वाहतात. मांजरा, तेरणा, धरणी, तीरु, तावरजा व मन्याड या नद्यांवर जिल्ह्यात धरणे बांधण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्याचे हवामान उष्ण, काहीसे सौम्य व कोरडे असून  पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचे आहे. जिल्ह्यात  बांधकामाचा दगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो.

     प्रारंभीच्या काळात मौर्यांच्या अधिपत्याखाली असणारा हा भाग पुढे सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याच्या अंमलाखाली होता. पुढे काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले. मध्यंतरी औरंगजेबाने हा भाग मोगल सत्तेच्या अंमलाखाली आणला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत निजामाच्या अखत्यारीत असणारा हा भाग १९४८ मधे तत्कालीन मुंबई इलाख्यात समाविष्ट करण्यात आला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असणारा लातूरचा भाग १५ ऑगस्ट, १९८२पासून उस्मानाबादपासून वेगळा करण्यात आला व अशा प्रकारे स्वतंत्र लातूर जिल्हा अस्तित्वात आला.

     २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची  लोकसंख्या २४,५५,५४३ एवढी असून जिल्ह्यात दर चौरस कि.मी.मध्ये सुमारे ३४३ व्यक्ती राहतात. लातूर हे महाराष्ट्र , आंध्रप्रदेश, कर्नाटकच्याच सीमेवर असल्यािने अनेक परंपरा, रूढी यांची देवाणघेवाण झाली आहे. लातूर जिल्हा  व त्याधलगतचे कित्येकक लोक मराठी-हिंदी व्युतिरिक्त  कन्नाड आणि तेलगु भाषा सहज बोलतात.

     संपूर्ण लातूर जिल्हा बालाघाट पठारावर समुद्रसपाटीपासून ४४० ते ६२६ मीटर उंचीवर वसलेला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या खोऱ्यांमध्ये  कन्हार ही अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी व मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते. कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत.

     सद्य:स्थितीत लातूर, निलंगा व औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून हाळी-हंडरगूळी, देवणी, अहमदपूर व मुरूड या ठिकाणी छोटे-मोठे उद्योग चालतात. उदगीर येथील दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे. वार्षिक उलाढालीचा विचार करता महाराष्ट्रातील सर्वांत मोठी आडत बाजापेठ लातूर येथे आहे. शिवाय जिल्ह्यात सहा साखर कारखाने आहेत. प्लॅस्टिक बूट व चप्पल निर्मितीचे लातूर हे देशातील मोठे केंद्र आहे.

     जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत. लातूर शहर मनमाड-सिकंदराबाद या रुंदमापी (ब्रॉडगेज) लोहमार्गाशी जोडण्यात आले आहे. औरंगाबाद येथे जिल्ह्याला जवळ असणारा विमानतळ आहे.लातूरजवळ एक विमान-धावपट्टीही आहे.

     प्रसिद्ध स्थापत्य विशारद फैयाजुद्दीन यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर इत्यादी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

     मराठे व निजाम यांच्या लढाईचे साक्षीदार असणारे उदगीर शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून येथील यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याभोवती असणारा ४० फूट खोलीचा खंदक आणि जमीन पातळीपासून ६० फूट खोलीवरील श्रीउदयगीर महाराजांची समाधी हे येथील मुख्य आकर्षण आहे. उदगीरचा जनावरांचा बाजार देवणी जातीच्या वळूंसाठी प्रसिद्ध आहे. औसा येथील मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. औसा तालुक्यातील खरोसा या गावातील  हिंदू व बौद्ध लेणींमधील शैव पद्धतीची शिल्पे प्रेक्षणीय आहेत. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील दुर्मीळ औषधी वनस्पतींची टेकडी प्रसिद्ध आहे. येथील रेणुकादेवीचे मंदिर आणि या परिसरातील हलणारी दीपमाळ ही जिल्ह्यातील ठिकाणे जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकतात.

     लातूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी जोडलेला आहे. या विद्यापीठा-अंतर्गत सर्वांत जास्त ६६ महाविद्यालये या जिल्ह्यात आहेत. लातूर शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून शिक्षणाच्या बाबतीत लातूरला मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून लातूर जिल्हा प्रामुख्याने इयत्ता १० वी व १२ वी च्या शिक्षणाच्या दृष्टीने एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. आज लातूर मराठवाडा विभागातील एक सर्वांगीण महत्त्वाचा जिल्हा बनला आहे.

‘विश्वेश्वर’ची चौफेर नजर!

आलमल्यासारख्या लातूर जिल्ह्यातील आड गावात शहरी शिक्षणाला लाजवेल असे शिक्षण आणि नैसर्गिक सानिध्य! जे जे शहरी शिक्षणात आहे ते सर्व व शिवाय, नव्याने आणखी काही ‘विश्वेश्वर शिक्षण मंडळा’ने निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा तत्पर उपयोग घडवून आणून त्यांच्यामध्ये देशपातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावण्याची किमया त्या शिक्षणसंस्थेने उभी केली आहे. त्या महाविद्यालयात टेक्निकल शिक्षण आहे. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी नेहा पाटील ही पहिली मुलगी अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन पॉलिटेक्निकमध्ये प्रथम आली व यशाचा मान संस्थेच्या शिरपेचात खोवला गेला. क्रमश:

उजनी - बासुंदीचे गाव

उजनी हे गाव नागपूर - सोलापूर महामार्गावर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. तेरणा नदीच्या काठावरची उजनी दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तेथे महावितरणचे १४४ केव्ही उपकेंद्र आहे. तेथून अर्ध्या महाराष्ट्राची वीज वळते. सोलापूर जिल्ह्यातही एक उजनी आहे. ती तेथील धरणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच लातूरची उजनी ओळखण्यासाठी त्यास 'लाइटची उजनी' असे संबोधन प्राप्तप झाले आहे. पण उजनीची त्याहून मोठी ओळख म्हणजे तेथील घट्ट, स्वादीष्ट बासुंदी! त्या गावाची 'बासुंदीची उजनी' म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली आहे. उजनीत साधारणपणे ऐंशी वर्षांची बासुंदीची क्रमश:

अपनी पसंद की जिंदगी

मी अहमदपूरला महात्मा गांधी महाविद्यालयात शिकत होतो, त्या वेळी प्रा. निशिकांत देशपांडे यांच्यासोबत अंबाजोगाईला जाऊन अमरला पहिल्यांदा भेटल्याचे मला आठवते. मी १९८५ साली चंद्रकांत झेरीकुंठे यांच्यासोबत ‘दैनिक लोकमन’ची सुरुवात केली. त्यानंतर पत्रकार अमर हबीबची ओळख होऊ लागली. शेतकरी संघटनेच्या चळवळीने ८६-८७ मध्ये चांगला जोर धरलेला होता. मी शेतकरी घरातून आलेलो असल्याने व शेतीतील दु:खांची अनुभूती असल्याने मी ‘लोकमन’मध्ये शेतकरी संघटनेच्या बातम्यांना प्राधान्य देत होतो. त्या विषयावर अग्रलेखही लिहीत होतो. अमर त्या काळात संघटनेत सक्रिय होता. आमची खरी ओळख क्रमश: