नागपूर

नागपूर

अरुणा सबाने – बाईमाणूस अन्...

अरुणा सबाने हे विदर्भातील आजचे स्त्रीनेतृत्व आहे. अरुणा सबाने या विदर्भातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकपदरी आहे. संवेदनाशील लेखिका, संपादिका, प्रकाशिका आणि खंदी समाज कार्यकर्तीअशी त्यांची ओळख आहे. आकांक्षा मासिक, आकांक्षा प्रकाशन, माहेर महिला वसतिगृह, बहुजन रयत परिषद, अखिल भारतीय जलसंस्कृती मंडळ, दलित मानवाधिकार समिती, प्रगतीशील लेखक संघ अशा अनेक संस्था-संघटनांच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. परंतु या सगळ्या कामाच्या तळाशी एकच एक गोष्ट आहे. ती म्हणजे अरुणा यांना स्त्रीजीवनाबद्दल वाटणारी आत्यंतिक तळमळ. त्यांच्या मनाजवळून वाहणारा क्रमश:

पद्मश्री डॉ. विकास महात्मे

लोकसेवा हीच ईशसेवा   पद्मश्री डॉ. विकास महात्मे हे मूळचे अमरावतीचे, मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांनी नेत्रतज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. विकास यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून झाले. त्यांना घर शेणाने सारवण्यापासून सर्व कामांची लहानपणापासून सवय होती. घरी वीज नसल्यामुळे कंदिलाच्या उजेडात अभ्यास करून त्यांनी एस.एस.सी.ची परीक्षा दिली. लोकसेवा हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवूनच त्यांनी बारावीनंतर नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी नागपूरच्या सरकारी वैद्यकीय क्रमश:

विदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक

महाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यातील कथा अशी – एका यक्षाच्या हातून चूक होते. यक्षांचा राजा कुबेर याच्या आज्ञेवरून त्या यक्षाला गृहत्याग करावा लागतो. तो यक्ष दूर रामगिरी पर्वतावर जाऊन राहतो. कुठे कुबेराची राजधानी अलकावती नि कुठे रामगिरी! रामगिरी येथे असताना, यक्षाला त्याच्या पत्नीची आठवण येते. तो विरहाने व्याकूळ होतो. आषाढ महिन्यात आकाशात मेघ जमा होऊ लागतात. यक्ष त्यातील एका मेघाबरोबर रामगिरीहून त्याच्या पत्नीला खुशालीचा निरोप पाठवतो. ‘मेघदूता’त निसर्गाचे आणि विरहातून निर्माण झालेल्या अतीव प्रेमाचे यथार्थ वर्णन आढळून येते क्रमश:

बसोली आणि चंद्रकांत चन्‍ने

मुलांच्‍या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्‍स! मग ते १५ ऑगस्टचे व २६ जानेवारीचे भाषण असो, सामुहिक गायनवृंदातला सहभाग असो वा शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेली कथा-कविता असो. त्याचा ‘प्रकाशक’ म्हणून यादगार ठरतो तो शिक्षकच. नागपुरचे चित्रकार आणि शिक्षक चंद्रकांत चन्ने हे असेच एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे. चंद्रकांत चन्ने बसोली या चळवळीच्‍या माध्यमातून गेल्या छत्तीस वर्षांपासून लहान मुलांच्‍या कलागुणांना हळुवार क्रमश:

आभाळाएवढा बाप

‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्दैवाने देहविक्रय करणार्‍या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे कार्य या दुर्लक्षित क्षेत्रात आहे. रामभाऊ इंगोले यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे रामभाऊंना लहानपणापासून समाजसेवेचे जणू बाळकडू मिळाले. त्यांच्या कार्याची सुरुवात नागपूरमधील वेश्यावस्ती हटवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या षड्यंत्राविरुद्ध लढा देण्यापासून, १९८० मध्ये झाली. रामभाऊंवर अनेक वेळा गुंडांकडून हल्ले झाले, तरीही ते त्या आंदोलनात डगमगले नाहीत. वेश्या या समाजाच्या घटक असूनही क्रमश: