नांदेड

नांदेड

कंधारचे बुधाईचे ठाणे

बुधाई देवीचे ठाणे बोड्डावार या विणकर समाजाच्या घराण्यात बहाद्दरपुरा, तालुका कंधार येथे आहे. रामजी बोड्डावार हे बुधाई देवीचे मानकरी पन्नासच्या दशकात होते. बुधाईची समाधी गावातील महाकाली मंदिराजवळ बांधण्यात आली आहे. बुधाई ही मूळची बोधन. ती निजामाबाद - (आंध्र) येथील असून तेथून ती बहाद्दरपुरा येथे आली. तिने तेथे समाजसेवा केली. तिने गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. बुधाईचा सत्कार किल्ल्यातील राजानेही केला होता व तिला साडी-चोळी ‘भेट’ देऊन तिचे दर्शन घेतले होते. बुधाईच्या पूजेच्या दिवशी बुधाईच्या आडापासून गावात मिरवणूक वाजतगाजत निघते. मिरवणुकीत क्रमश:

ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज...

वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो. देगलूरकर घराण्यातील संत परंपरेचा इतिहास जवळपास दोनशेसाठ वर्षाचा आहे. त्या घराण्याचे मुळ पुरुष गुंडा महाराज यांचा जन्म 1753 साली महिपती नाईक आणि भाग्यवती यांच्या पोटी देगलूर येथे झाला. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सराफीचा होता. गुंडा महाराजांना बालपणापासून संतसंगाची आवड होती. त्यांनी ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा लाभलेले सिद्धयोगी संत चुडामणी महाराज यांचे शिष्यत्व पत्करले. गुंडा महाराजांनी भारतभर तीर्थयात्रा केली. तिचा आरंभ देगलूर ते पंढरपूर पदयात्रेने क्रमश:

मधुकर धर्मापुरीकर - व्यंगचित्रांचा...

एखादे व्यंगचित्र किती खळबळ माजवू शकते याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला, मुंबईतील असीम त्रिवेदी या तरुण व्यंगचित्रकाराच्या एका व्यंगचित्रामुळे. त्याच्याविरुद्ध त्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र त्या विरुध्द जनक्षोभ उसळताच तो मागेही घेण्यात आला. म्हणूनच वृत्तपत्रामधील शंभर अग्रलेखांचे काम एका 'मार्मिक' व्यंगचित्राने होऊ शकते असे म्हणतात. व्यंगचित्र म्‍हणजे सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमधील विसंगती-विरोधाभास प्रकट करून त्यातून समाजप्रबोधन करण्याचे प्रभावी माध्यम. त्यामुळे कोणतेही वृत्तपत्र उघडले, की त्यामध्ये व्यंगचित्र हमखास नजरेस क्रमश:

माळेगावची जत्रा

भारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव पहिल्यांदाच घेतला! खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्हारी, मल्हारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी खंडोबाला वेगवेगळी नावे आहेत. खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्ये मिळून एकूण बारा स्थाने आहेत. त्यांपैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. श्रीक्षेत्र माळेगावचा खंडोबा म्हणजे लोकांचा देव. माळेगावचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा हेच आहे, क्रमश:

लोकजत्रा

माळेगावची जत्रा म्हणजे केवळ खाद्यपदार्थांची-कपड्यांची दुकानं आणि आकाश पाळण्यांचा खेळ नव्हे. ती सामजिक अभिसरणाला मदत करते... मार्गशीर्षाचा महिना मध्यावर आला म्हणजे मन्याड खो-याच्या टापूत माळेगावच्या जत्रेची लगबग सुरू होते. जत्रेचा आरंभ मार्गशीर्षाच्या अवसेला मल्हारी म्हाळसाकांत खंडेरायाच्या देवसवारीनं होतो. 'यळकोट यळकोट, जय मल्हार' च्या जयघोषानं आसमंत गर्जू लागतो.  आभाळाच्या निळाईवर खंडोबाच्या देवसवारीवर उधळलेलं खोबरं अन् बेलभंडार भारी वाटतो. मल्हारी देवाच्या वाटेवर भक्तगण आपल्या देहाच्या पायघड्या अंथरतात. त्यापुढे अंगात आलेले पाच-पन्नास वारूं घुमत असतात क्रमश: