उस्मानाबाद

उस्मानाबाद   

रणजिता पवार - तांड्यावरील पहिली...

रणजिता लमाणी आहे. ती तांड्यावर लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने स्वत: समाजाच्या जाती-जातींतील विषमता अनुभवली. तिने तांड्यावरील शैक्षणिक अनास्थेला झुगारले. तिने कुटुंब, जातपंचायत यांचा विरोध व प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करत डी.एड.पर्यंत शिक्षण घेतले. रणजिताने जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर तांड्यावरील पहिली शिक्षिका होण्याचा मान मिळवला. आज, ती तांड्याच्या विकासासाठी काम करत आहे. रणजिता गणेश पवार ही ‘सामर्थ्य’ संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये काम करते.     रणजिता तांड्यावरील मुलांची शैक्षणिक प्रगती, क्रमश:

माणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव,...

मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक अशीही ओळख आहे. शिव-सटवाई ह्या ग्रामदैवताची हेमाडपंथी मंदिरे विश्वरूपा नदीच्या डाव्या तीरावर, माणकेश्वर गावापासून पूर्वेस, एक-दीड किलोमीटर अंतरावर आहेत. शिव आणि सटवाई या दोन देवतांच्या उत्सवप्रसंगी धार्मिक विधी सामुहिक स्वरूपात पार पाडले जातात. ग्रामस्थांमध्ये त्या निमित्ताने ऐक्य व सामंजस्य या भावनांचा सागर ओसंडून वाहताना दिसतो. माणकेश्वरची ख्याती महाराष्ट्रात आणि क्रमश:

मराठवाड्याची पहिली महार, मांग,...

लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याचे १९८२ मध्ये विभाजन होऊन स्थापन झाला. सोलापूर जिल्ह्यातील जी गावे उस्मानाबाद जिल्ह्याला जोडण्यात आली, त्यांपैकी येडशी आणि कसबे-तडवळे ही दोनच मोठी होती. कसबे-तडवळे हे येडशी ते ढोकी या रस्त्यावरील गाव. त्या गावाची वस्ती १९४०-५० च्या काळात शंभर घरांची असेल. त्यात ब्राह्मण समाजाची घरे अधिक होती. तेथील श्रीरामाचे मंदिर पुरातन आणि परिसरात प्रख्यात असे आहे. त्यामानाने लहान अशा त्या गावात १९४१ साली हैदराबाद संस्थानाच्या ताब्यातील इलाख्यामधील महार, मांग आणि वतनदार परिषद झाली होती व त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित झाले होते. क्रमश:

सुहास मस्केची लावणी चहाच्या...

सुहास मस्के यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा गावचा. त्यांचे वडील संभाजी तहसीलदार कार्यालयात लिपीक म्हणून काम करत, तर आई गृहिणी. सुहास यांना दोन भाऊ -सुधीर आणि सुनील. पाच जणांचे मध्यमवर्गीय कुटुंब. घरात शिक्षणाला पोषक वातावरण. सुहास यांनी कलाशाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले. सुहास म्हणतात, "वडिलांच्या बदली होत. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण भूम तालुक्यात झाले. पुढे बारावी बार्शीत केली आणि पदवी शिक्षण परांड्यात केले. आमच्या वडिलांना आणि आईला वाटायचे, मुलांनी खूप शिकावे. चांगली नोकरी करावी. पदवी मिळाली पण नोकरीचा पत्ता नाही." त्यामुळे सुहास व्यवसायाकडे क्रमश:

निर-अहंकारी!

उस्‍मानाबादच्या अणदूर गावी डॉ. शशिकांत व शुभांगी अहंकारी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘जानकी रुग्णालय’ सुरू केले ते सेवाभावनेने. त्या एका वास्तूमधून भलेमोठे सामाजिक कार्य उभे राहिले आहे. त्याचा पसारा सत्तर खेड्यांमधे आहे. परंतु त्या विस्तारापलीकडे त्यांनी आरोग्य व स्त्रियांवरील अन्याय याबद्दल जी जागृती निर्माण केली आहे आणि त्यामधून जी पर्यायी व्यवस्था उभी राहू पाहत आहे, ती महत्त्वाची! अणदूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेले छोटे खेडेगाव. ते सोलापूरपासून चाळीस किलोमीटरवर अंतरावर आहे. त्या ठिकाणी डॉ. शशिकांत अहंकारी व त्यांच्या क्रमश: