महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित

11 जून 2016

'महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित' हा 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन असलेला ग्रंथ. वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक दिनकर गांगल आणि कार्यकारी संपादक डॉ. यश वेलणकर यांनी तो संपादित केला आहे.

पुस्‍तकाच्‍या आरंभी संपादक दिनकर गांगल यांनी लिहिलेला 'मेंढालेखातील खुशी' हा सचित्र लेख आहे. मेंढालेखा हे आदिवासी गाव नक्षलवादी टापूत येते. तेथील गावक-यांनी अशा गावात लोकशाही विकेंद्रीकरणाचा लढा यशस्‍वी करून दाखवण्‍याचा चमत्‍कार घडवला आहे. पुस्‍तकातील सर्व लेख महाराष्‍ट्राचे सामाजिक आणि सांस्‍कृतिक वैशिष्‍ट्याचे प्रतिनिधीत्‍व करतात. मलखांबाचा इतिहास आणि वैशिष्‍ट्ये विषद करणारा 'खेळांचा राजा - मल्‍लखांब', पुण्‍याच्‍या वैशिष्‍ट्याची ओळख करून देणारा 'पुण्‍यातील मंडई विद्यापीठ', वीणा गोखले यांच्‍या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती देणारा 'देणे समाजाचे', ओवळेकरांची मनमोहक आणि चित्‍तवेधक 'फुलपाखरांची बाग', तर कमळांच्‍या वेडातून कमळांची अनोखी बाग घडवणारे सतीश गदीया यांच्‍यासंबंधीचा लेख अशी त्‍या ग्रंथाची वैशिष्‍ट्ये सांगता येतात.

चळवळीमधील कार्यकर्त्‍यांपासून छांंदिष्‍ट व्‍यक्‍तींपर्यंत, भवताल समजून घेण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या माणसांपासून समाजातला चांगुलपणा जाणून घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तींपर्यंत, सा-यांसाठीच हा ग्रंथ उपयुक्‍त आहे.

महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित
संपादक - दिनकर गांगल, डॉ. यश वेलणकर
प्रकाशक - व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन
पृष्‍ठ - १३८
किंमत - ३५० रुपये.

'महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित- हा ग्रंथ येथे ऑनलाईन विकत घेता येऊ शकेल. ग्रंथाची किंमत ३५० रुपये असून पैसे भरल्‍यानंतर दहा दिवसांच्‍या आत ग्रंथ कुरिअर किंवा स्‍पीडपोस्‍टद्वारे पाठवला जाईल. पैसे भरल्याची डिजिटल पावती वाचकांना इमेलवर पाठवण्‍यात येईल. (पोस्‍टींग खर्च 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'तर्फे करण्‍यात येईल. मात्र ही सवलत मर्यादीत काळासाठी उपलब्‍ध आहे. तथापी ही योजना केवळ महाराष्‍ट्रातील वाचकांसाठी आहे. महाराष्‍ट्राबाहेरील वाचकांनी पुस्‍तक घेण्‍याकरता कृपया 'थिंक महाराष्‍ट्र'ला (०२२) २४१८३७१०,२४१३१००९ या क्रमांकावर संपर्क करावा. भारताबाहेरील वाचकांसाठी हे पुस्‍तक 'रसिक मराठी डॉट कॉम'वर उपलब्‍ध आहे.)

आपला अभिप्राय नोंदवा