घडशी


घडशी ही एक जात आहे. त्‍या जातीचे लोक महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. वाजंत्री वाजवणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते त्‍यांच्‍या उत्पत्तीची कथा सांगतात, ती अशी - राम व सीता यांच्या विवाहाच्या प्रसंगी वाजंत्री मिळाले नाहीत. तेव्हा रामाने चंदनाचे तीन पुतळे तयार करून त्यांच्यात प्राण फुंकला. त्‍यापैकी एकाला संबळ, दुस-याला सूर व तिस-याला सनई दिली. ते तिघे घडशांचे मूळ पुरूष होते. काही ठिकाणी घडशी जात ही मांग जातीतील पोटजात मानतात. या जातीचे लोक कर्नाटक राज्‍यातही आढळतात.

समाजात बारा बलुत्‍यांच्‍या रचना अस्तित्‍वात होती, त्‍या काळी अलुतेदारांच्‍या यादीत घडशी जातीचा उल्‍लेख्‍ा आढळतो. पूर्वीच्‍या काळी अलुतेदार ठराविक हंगामात एका गावातून दुस-या गावी येत-जात असत. त्‍यांमध्‍ये गोंधळी, घिसाडी आणि घडशी जातीचे लोक प्रामुख्‍याने असत, असा उल्‍लेख मराठी विश्‍वकोषात आढळतो.

घडशी जातीत दोन पोटभेद आहेत. त्यांच्यात आते-मामे बहिणीशी लग्ने होतात.

‘घडशी’ शब्दाशी संलग्न असा दुसरा शब्द आहे ‘घडस’. घडस हे एक द्विमुखी वाद्य आहे. त्याची उजवी बाजू चामड्याने मढवतात व डावी बाजू दोरीने बांधतात. दोरी डाव्या हाताच्या तर्जनीने दाबून धरतात. चामड्याची बाजू हाताने व डावी बाजू बोटाने वाजवतात. त्या‍वेळी हाताला मेण लावतात. उजव्या हाताच्या घर्षणाने त्या वाद्यातून ‘घो’ कार उत्पन्न होतो. याला ‘डिंडिम’ असे दुसरे नाव आहे.

(संदर्भ - भारतीय संस्‍कृतिकोष, खंड ३)

लेखी अभिप्राय

हे घडशी नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र वाजंत्री जात उल्लेखावर आढळतात. ते लोक सरळ व साधे जीवन जगतात. आपल्या जातीसह इतर जातीतही मिसळून राहतात. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सराईत चार रूपये कमाई करतात. त्‍याच्यावर त्यांचा प्रपंच चालवतात. त्‍यांना शासकीय मदत नाही. हे वाजंत्री म्हणजेच घडशी नागरीक आहेत.

शिवाजी कदम घड…29/02/2016

घडशी हे वाद्य पूर्वी राजवाडे देवालयात धनीकांचा दारी घडशी वाजंत्री वाजवत असत. लग्नाची कामे, मिरवणूक अशा अनेक शुभ कार्यासाठी योग्य बिदागी (रक्कम) घेऊन ते स्‍वतःचे व परीवाराचे पोट भरतात.

शिवाजी कदम घडश…29/02/2016

मी पण घडशी आहे मी पुणे जिल्ह्यातील भोर गावी रहातो, भोर एक संस्थान आहे रामनवमी ऊत्सवावेळी आम्ही साळुंके कुंटुंबीय परंपरागत तेथे वाद्य वाजवतो,
फार पुर्वी पासुन राज रजवाडे घडशी जात आस्तितवास आहे
सनई चौघडा, बॅन्ड, तुतारी वाजवणे हे आमचे मुख्य काम
ह्यावरच आमच्या कुटुंबाचा ऊदर निर्वाह चालतो

सुरज25/08/2018

chan

vinayak ghadshi18/12/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.