माझं गाव मोडनिंब!


पांढरी नावाची छोटी वाडी होती. लोक गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु प्लेगची साथ आली आणि लोकांनी गाव सोडले. जवळच ओढा होता. ओढ्याच्या पलीकडे लिंबाची भरपूर झाडे होती. ती झाडे मोडून लोकांनी तेथे वस्ती केली आणि त्यामुळे गावाला नाव पडले मोडनिंब! काही लोक त्यास मोडलिंब असे म्हणतात.

गावाजवळच्या ओढ्यामध्ये श्री वेताळसाहेबांचा पार आहे, तर गावच्या पूर्वेला श्री सिद्धेश्वराची पावननगरी असे शेटफळ नावाचे खेडे आहे. पश्चिमेला भक्तीचा मळा फुलवणारे संत सावता माळी यांचे अरण. उत्तरेस जाधववाडी, बैरागवाडी तर दक्षिणेस सोलंकरवाडी. त्यांच्या मधोमध मोडनिंब!

स्वातंत्र्यपूर्व मिरज संस्थानात मोडनिंब हे तालुक्याचे ठिकाण होते. मिरज संस्थानचे राजे बाळासाहेब पटवर्धन यांच्या राजवाड्यातून भुयारी मार्ग होता. तो पश्चिमेकडे ओढ्याच्या पलीकडे जेथे संस्थानाची कोर्टकचेरी होती, तेथे निघे. तेथे सुंदर बाग होती. त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेली होत्या. त्या भागाला गोल असे म्हणत. तेथून पंढरीचा पांडुरंग अरण येथील श्री संत सावता माळी यांच्या भेटीस गेला अशी आख्यायिका आहे. ओढा ओलांडून गावात प्रवेश करताना मारुती मंदिर, मुस्लिमांची मशीद, महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर व एक मोठी वेस लागते. ती वेस ओलांडली, की छोटी बाजारपेठ आहे. त्या पलीकडे, एकशेपंचवीस वर्षांपूर्वीचे जैन मंदिर. अतिशय सुंदर, कोरीव लेणेच जणू! तेथून पुढे, शहांचे कापडदुकान. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शहा लोकांचीच घरे तर दक्षिणेकडे मुस्लिम घरे. तेथेच वाणी समाज, काही ब्राम्हण मंडळी आनंदाने राहतात. त्यांच्या पलीकडे रामोशीवाडा, मांगवाडा, महारवाडा. त्यांच्यानंतर गावची पश्चिमेकडील वेस. वेशीच्या बाहेर खंडोबा व देवीचे प्राचीन मंदिर. तसाच वळसा घातला, की सरकारी दवाखाना, तलाठी कार्यालय (चावडी), सुतार-लोहारांची घरे. पुढे, चांभारवाडा. पुन्हा वळसा घातला, की परीटवाडा, कासार गल्ली, कोळीवाडा, न्हावी गल्ली... गावाची रचना अशी गोलात गोल होत गेली आहे. गावाला तटबंदी होती आणि मधील गोलात पाटील व कुळकर्णी यांची घरे होती. अठरापगड जाती असलेले गाव. गावाच्या उत्तर बाजूस लांडी वेस. त्याच्याबाहेर करकंब व अरण रोड. गावापासून स्टेशन व स्टँड हे  फारच लांब, गावाजवळून जाणारा नॅशनल हायवे नंबर 9 व नॅरो गेज रेल्वेगाडी. त्याच्याच बाजूला श्री उमा विद्यालय (उमा स्मारक संस्था)

मोडनिंबची बाजारपेठ मिरची व कांदा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथील मिरची ही मोडनिंबी मिरची म्हणून प्रसिद्ध होती व तेथून तिचे दर ठरवले जात. महाराष्ट्राच्या नकाशावर मिरचीमुळे मोडनिंबचे नाव कोरले गेले. परप्रांतातील मोठमोठे व्यापारी तेथे येत. तेथील बाजारपेठ कांद्यासाठीही प्रसिद्ध होती. जनावरांचा बाजार मोठा भरत असे.

मोडनिंबचा खून खटला व शहा यांच्या घरावर पडलेला दरोडा यांमुळे मोडनिंब गाव महाराष्ट्रभर माहीत झाले. हिराचंद नथुराम शहा हे मोडनिंबचे फार मोठे व्यापारी होते. त्यांच्या  घरावर पारधी समाजातील कल्याण बाजी काळे या माणसाने दरोडा टाकला होता. ती संपत्ती लुटून नेत असताना मोडनिंब पासून अनगरपर्यंत ब-याच ठिकाणी पडली होती. तो दरोडा खूप गाजला. पण मोडनिंब म्हणजे सर्वांना समजून घेणारे व्यापारी वृत्तीचे गाव, आपसात न भांडणारे गाव. सहनशीलता काय असते ते त्या गावाकडूनच शिकावे असे स्थानिकांचे मत.

धाब्याची घरे, सरकारी दवाखाना, चावडी, धर्मशाळा, ग्रामपंचायत, 1942 च्या आसपासचा राजवाडा, सिनेमाचे टॉकिज, गाढवलोळी, गावातील वेताळसाहेब. त्या सर्व गावच्या प्रमुख खुणा. मोडनिंबच्या एका भागात खूप गाढवे होती, म्हणून त्या भागाला गाढवलोळी हे नाव पडले.

मोडनिंब ग्रामपंचायतीची स्थापना झाली. प्रथम सरपंच चंद्रभान पाटील व नंतरचे प्रभाकरपंत साठे. मालक म्हणून नावारूपास आलेले. मोडनिंबची सत्ता त्यांच्याच भोवती फिरू लागली. गावातील अंतुनाना साठे यांचा मोठा वाडा चौसोपी आहे. त्याच वाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील चर्चा रंगायच्या.

छात्रसाल व सम्राट अशोक या कादंबरीचे लेखक कै. वालचंद नानचंद शहा म्हणजे मोडनिंबचे भूषण शहा. त्यांचा जन्म मोडनिंब येथे 1886 साली झाला. त्यांचे शिक्षण पुणे व मुंबई येथे डिस्ट्रिक्ट प्लीडर व हायकोर्ट प्लीडर इतके झाले.

पहिल्या महायुद्धाच्या सुमारास कादंबरीकार वालचंद नाणचंद शहा वकील ही नवीन व्यक्ती उदयास आली. त्यांची ‘सम्राट अशोक’ ही पहिली कादंबरी 1913 साली प्रसिद्ध झाली. कादंबरीची उच्च भाषाशैली वाङ्मयात शोभून दिसणारी होती. त्यानंतर 1915 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘छात्रसाल’ या कादंबरीमुळे शहा यांचे नाव दैदिप्यमान झाले. मुंबई विद्यापीठात व हिंगणे महाविद्यालयात बी.ए. व एम.ए.साठी या दोन्ही कादंबऱ्या अभ्यासक्रमात होत्या. ‘सम्राट अशोक’चे भाषांतर अनेक भाषांत झाले. त्यांच्या एकूण अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. शहा यांनी मोडनिंबला वकिली व्यवसाय केला. ते श्रीमंत राजे बाळासाहेब पटवर्धन मिरजकर यांच्या दरबारचे प्रमुख वकील होते. श्रीमंत उमाबाईसाहेब पटवर्धन यांनी मोडनिंब येथे शहा यांच्या अधिपत्याखाली ‘श्री उमा विद्यालय’ स्थापन केले. एक थोर साहित्यिक म्हणून त्यांचा सत्कार 1953 साली माढा येथे झाला. त्यांची प्राणज्योत वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी मोडनिंब येथे 1ऑक्टोबर 1955 रोजी हृदय विकाराने मालवली.

साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचा जन्म मोडनिंब येथील श्री नातू यांच्या वाड्यात झाला. म्हणून त्यांचा वरदहस्त या भूमीला मिळाला. मिरज संस्थानचे शिक्षणमंत्री मारुतीराव हरिराव महाडिक (तात्या) हे पेशाने वकील आणि पंचक्रोशीतील वैद्य म्हणून नाव मिळवणारे नफाराव गोरे व मिरज संस्थानातील वकील शंकरराव दफ्तरदार त्याच गावचे. हिराचंद नथुराम शहा (वेणाभाई) व श्री राघव गडधरे हे जातिवंत व्यापारी मोडनिंबचेच, तर नाट्यरसिक श्री कोठारीदादा त्याच भूमीतील. त्यांच्यामुळे अनेक नाटक मंडळी तेथे येऊन गेली.

मोडनिंबमध्ये महिलांनी स्‍वतःच्‍या पायावर उभे राहावे, सक्षम व्‍हावे यासाठी त्‍यांच्या कलेला वाव दिला जातो. त्‍यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अनेक कला आहेत. उदाहरणार्थ, शिवणकला, भरतकाम, पाककला आणि विविध हस्तकला. त्यांच्या नेहमी स्पर्धा भरवल्या जातात. मोडनिंबचा आठवडी बाजार हा शनिवारी भरतो. बाजारामध्ये डोंबारी व साप-गारुडी यांचा खेळ बघता येतो. तसेच रात्री, खास तमाशाही असतो. लोक त्याचा परिपूर्ण आनंद घेतात.

मोडनिंबमध्ये सध्या तीन कलाकेंद्रे आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी, पंढरपूर तेथील पठ्ठे बापुराव पुरस्कृत कै. ज्ञानोबा उत्पात हे येथील कलाकारांना लावणी शिकवण्यासाठी येत.

गावात पाऊस खूप पडायचा. ओढा सतत भरलेला असायचा. ओढ्यालगत विहीर होती. तिला ‘झरा’ असे म्हणत. संपूर्ण गाव तिचे पाणी पित असे. शेतकरी हा तेथील राजा होता. गहू, ज्वारी, कापूस, कांदा, मिरची इत्यादी पिके भरपूर होत. आज मात्र गावात पाणी नाही!
  
- विद्या केशवराव पाटील

Last Updated On 15th July 2017

लेखी अभिप्राय

खूप छान लिहिले आपल्‍या गावाबद्दल.आपले अभिनंदन.

सचिन विश्नु सुर्वे09/03/2015

ताई, आपला मोडनिंब गावाचा अभ्यास खूप आवडला. खरंच आपण मोडनिंब गावची माहिती नवीन पिढीला करुन दिली. त्याबद्दल आभार!

संतोष रामराव प…10/03/2015

Chan eityahasik mahiti gola keli. Modnimb cha itihasa baddal atachya pidhila janiv karun dili tyabaddal hardhik hardhik abhar, fakt ashich writing karun modnimb madhe development sathi help hot rahavi v jankar vyaktina, navya pidhila jagaruk karave, jenekarun modnimbacha ajun chehara mora badalel. Dhanyavad!

Dr Ashok Chavan10/03/2015

मोडनिंबच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

निलेश कणसे, मोडनिंब10/03/2015

Very nice information.

Chetan Salgar10/03/2015

खुप छान माहिती

सतिश निंबाळकर 10/03/2015

खूप छान माहिती.

सतिश निंबाळकर 10/03/2015

आवड निर्माण झाली.

निलेश जाधव10/03/2015

Nice

Valmik Jadkar 10/03/2015

Nice place.

swarup more10/03/2015

माझ्या आजोबांनी ही जुन्‍या काळी खूपच नाटके केली होती, असं मी ऐकले आहे. त्याचा उल्लेख नाही.

सुदर्शन सुभाष कोळी26/03/2015

Information is good. Include the information about 'GRAMDAIVAT YATRA'.

Mihir31/05/2015

GRAMDAIVAT YATRECHI MAHITI NAHI

MIHIR31/05/2015

खुपच छान....!!

विरेंद्र पाटील 17/10/2015

सुंदर ब्लॉग..

Aditya Samudra17/10/2015

Nice one. Thank you so much.

Rushikesh Lade17/10/2015

Modnimb baddalchi atishay sundar mahit tumchya mule amhala milali. Tyabaddal pratham tumche abhar. Mazya mate baryapaiki lokana gavabaddalcha itihas mahiti nasel.

siddhu s. surve18/10/2015

Best information.

Vishal Survase 18/10/2015

Nice information. Plz include the information about "yatra".

SuHas Mohite19/10/2015

Best information about Modnimb. Thanks for giving information.

Suresh Khandare 19/10/2015

Proud to be a part of Modnimb.

Vinayak Lade19/10/2015

मोडनिंबच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

Ashwamedh Todkari20/10/2015

मी उमा विद्यालयाचा विद्यार्थी आहे.

वैभव व्यवहारे21/10/2015

Khupch chaan ahe.....

Prashant Kshirsagar 12/06/2016

Thank U For The Information....I Learn At M.H.M College Modnimb....

Audumbar Gore12/06/2016

Nice information.

Prashant Patil 13/06/2016

खुपच छान माहिती आहे. येथील, जैन मंदिराचा इतिहास ही अतिशय क्षेत्र आहे।धन्यवाद ।

किरण गांधी सो…06/08/2016

खुपच जुना खरा इतिहास आहे. माझ्या स्मृति जागृत होऊन आनंद वाला ,

किरण गांधी स…07/08/2016

My grandfather late shri valchand nanchand shah is the founder of school uma Vidyalaya Modnimb. This was residesial school.

Vikram Raoji S…07/08/2016

very nice info given. we are proud of you bha (grandfather) Mr. Walchand Nanchand shah.

Mr. Vikram Shah27/08/2016

I am the granddaughter of late shri walchand nanchand shah , the great well known personality. Of Modnimb.
Thanks for giving rare and detailed information about Modnimb in such a nice way

Mrs . Suvarna …23/10/2016

Very nice information

vaibhav kanade 08/12/2016

अप्रतिम सुंदर, आवडली गावाची माहीती नवीन पीडीला ही कळने गरजेच होत,तुमचा मनापासुन आभारी आहे...

संदेश अरुण कदम12/01/2017

मला अभिमान वाटला हे सर्व वाचून

रोहित नवनाथ कणसे 12/01/2017

जुन्या आठवणी व मस्त लेखन

विजयसिंह गिड्ड…12/01/2017

खूप छान

pandurang Chav…12/01/2017

Aadhi gavabaddal aapulaki hoti hi mahiti vachalayane abhiman pan vatu lagala. Thanks

Suresh Jadkar12/01/2017

खूप छान..!!

अश्वमेध तोडकरी 13/01/2017

खुप छान अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद......,,

प्रथमेश शिंदे …13/01/2017

खरंच मोडनिंबचा इतिहास देदीप्यमान आहे.
Proud of being Modnimbkar

अनिल रोकडे 13/01/2017

Khupach chan modnimb gavachi history lihilyabaddal navin pidhila samaju shakel

Shashikant Salunke 13/01/2017

Khup chaan mahiti ahe. Kuthun milali hi mahiti?

Pritesh Kadam13/01/2017

I love modnimb

Abhijit Bhange 13/01/2017

Khupach chhan

Sudarshan bhosale13/01/2017

नविन पिढीला ही माहीती करून दिल्याबद्दल खुप खुप आभार.आणि आपण ही असेच लिहीत रहा त्यासाठी शुभेच्छा...!

प्रा. सोनिक पं…14/01/2017

chan ahe pan tumhi phadnis wada baddal kahich lihile nahit. ani tumhala mahit ahe ka shi gajanan vijay granth lihinare lekhak das ganu maharaj modlimb che hote

sudha apte02/02/2017

Manapasun abhar madam,apan dilelya maulyawan mahiti nehmuch smarnat thevin ani aplya Modnimb gavachi mahiti ethun pydhchya pidhila denyacha prayatna karin..Mala sarth Abhiman ahe mazya ya Modnimb gavacha...

Sanket Vyavahare17/07/2017

Khup chhan mahiti......???

Balasaheb wagaj 17/07/2017

नेमकेपणाने मोडनिंबचे वैभव मांडले आहे.

डाँ महादेव राऊत

Dr. Raut. M.R …02/11/2017

खुप सुंदर लिहिले आहे.

जुईली गांधी 13/03/2018

खुप छान लिहिले आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

जुईली गांधी 13/03/2018

Khup chan

Rahul Gandhi M…14/03/2018

It's nice

kinjal shah14/03/2018

खुप छान माहिती आहे.नवीन पिढीला माहिती करून दिल्या बद्दल धन्यवाद

Vishal Khadke 14/03/2018

Modnimb ani Parisarabaddal changali mahiti Milali.

Suhas Khadake14/03/2018

अप्रतिम!
Proud to be Modnimbkar

Raju Naikwadi 14/03/2018

अतिशय सुंदर

N. Jain14/03/2018

खुप छान माहिती ....

वाल्मीक जाडकर 15/04/2018

Mi Modnimb kar

Rambhau 15/04/2018

Very nice information

Shashikant kedar15/04/2018

ज्येष्ठ साहित्य सम्राट श्री न चि केळकर यांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.
मोडनिंब गावचा इतिहास खरच दैदिप्यमान आहे,मोडनिंबची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

अनंतराव भांगे 20/04/2018

खरच मोडनिंबचा इतिहास दैदिप्यमान आहे.
मला मोडनिंब बद्दल खूप प्रेम आहे.
मी श्री उमा विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे..

अनंतराव भांगे 22/04/2018

MODNIMB chi mahiti vachun anand zala Thank you

NITIN Gadadhare 29/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.