|
- सुरेश वाघे
पौराणिक कल्पनेनुसार आकाशगंगा म्हणजे एकचक्र रथात बसून ज्या मार्गाने जातो तो मार्ग होय. दुस-या ग्रंथात म्हटले आहे, की वामनावतारात विष्णू तिथे पाऊल टाकत असताना ते एका अंड्याला लागून अंडे फुटले. त्यातून निघालेला प्रवाह म्हणजे आकाशगंगा. बहुतेकांना स्वर्गारोहण करण्याची शिडी म्हणजे आकाशगंगा होय असे वाटते. स्वर्गातील अमरावतीला आकाशगंगेने वेढले असल्याचा उल्लेख भागवतात आहे. सुरेश वाघे यांनी सादर केलेली आकाशगंगेची पौराणिक आणि खगोलशास्त्रीय माहिती...
|
|
|
|
- जयंत पवार
एकविसाव्या शतकाच्या तिठ्यावर उभा राहून आज मी मागे-पुढे बघतो तेव्हा दुभंग दिसतो. माझ्यात आणि भवतालातही. नव्वदोत्तरी संवेदनशीलता नावाचा प्रकार साहित्यात जमेस धरला जाऊ लागला, तेव्हा त्या धुमाळीत लिहिणा-यांपैकी मी एक होतो. स्वतःचं असं काही गवसलंय, असं वाटावं अशी स्थिती नव्वदीच्या दशकातच प्राप्त झाली. त्याआधीच्या माझ्या नसणा-या अवकाशाबद्दल उसनं अवसान आणून लिहिताना येणारं रितेपण जाणवेनासं झालं. असं काय घडलं होतं आसपास, ज्याने ही ‘स्व’ची जाणीव घट्ट केली, असा मी विचार करतो तेव्हा माझ्या सांस्कृतिक भवतालावर होणारं आक्रमण दिसतं...
|
|
|
|

समाजशास्त्रीय निरीक्षणांत एकेका व्यक्तीशी निगडित वागणुकीला विशिष्ट समूहसंख्येने गुणून त्या समूहाच्या वागणुकीचा अंदाज लावता येत नाही. इतर परिणामकारक घटकांच्या जोडीला समूहाचं ‘समूह’पणही फार महत्वाचं, इतर सगळ्यांवर मात करु शकणारं असतं. त्याचमुळे ‘समूह’पण नक्की कशामुळे निर्माण झालेलं आहे हे समजून घेणं फार महत्वाचं असतं. चिंचोळ्या जागेतून विरुद्ध दिशेने जाताना घाईतही लोकं आपोआप रांगा लावतात, ते काही सारासार विचार करून, जनमत घेऊन नव्हे, तर उत्स्फूर्तपणे. तर निदान ह्या अशा वरकरणी उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा गुंता सोडवायला रेशेफ बंधू वा अशा इतर प्रणालींचा उपय़ोग होईल असे वाटते.
|
|
|
|
- प्रतिनिधी
मराठीतील प्रसिद्ध लेखक व पत्रकार अरूण साधू यांच्यासाठी तो दिवस अत्यंत मोलाचा होता. सहकारी साखर उद्योगाचा पाया घालणा-या सहकार महर्षी कै. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावर अरूण साधू यांनी लिहीलेल्या ‘दि पायोनियर- लाईफ अँड टाईम्स ऑफ विठ्ठलराव विखे पाटील’ या दिर्घ इंग्रजी चरित्र ग्रंथाचा प्रकाशनसोहळा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांच्या हस्ते दिल्लीत पार पडत होता.
|
|
|
|
|
- ऋचा गोडबोले
मेंदूवर आणि मनावर रासायनिक ताबा मिळवायचे प्रयत्न मानवाच्या संस्कृतीविकासाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेले आहेत, त्यातले बरेचसे प्रयत्न हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत चालत आलेले आहेत. विष पाजून एखाद्याला ठार मारणं हे जिवंतपणी त्याला आपल्या मनासारखं वागायला लावण्यापेक्षा अगदीच सोपं आहे. असा कृतीशील ताबा घेण्यातली महत्वाची बाब म्हणजे असा ताबा घेतला जाण्यापेक्षा दिला जातो,. मेंदूच्या पूर्ण सहकार्याशिवाय त्यावर रासायनिक पगडा बसू शकत नाही.
|
|
|
|
अहिराणी ही खानदेशची मध्यवर्ती बोली आणि येथील लोकभाषा आहे. खानदेशीच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘अहिराणी’ असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारात खानदेशातील सर्व जातीजमातींचे लोक ‘खानदेशी बोली’ बोलतात. या खानदेशी बोलीवर शेजारच्या भू-प्रदेशात बोलल्या जाणार्या बोलीचा प्रभाव पडून खानदेशी बोलीचा वेगळा प्रभेद निर्माण होतो. या बोलींची प्रादेशिकता, स्वतंत्र जाती तसेच या भाषेच्या शब्दांचे नमुने याबद्दल प्रा. रमेश सुर्यवंशी यांनी केलेले हे लेखन.
|
|
|
|
- संजीव साने
ठाण्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणारी डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्या सत्तावीस वर्षांपासून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. दरवर्षी आठ ते नऊ दिवस चालणा-या या व्याख्यानमालेत व्याख्यानं, टॉक शो, मुलाखत अशा स्वरूपाचे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात. ‘सामान्य लोकांकडून सामान्य लोकांसाठी चालवण्यात आलेली व्याख्यानमाला’ हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरते. व्याख्यानमालेचे आयोजक संजीव साने यांच्याकडून या व्याख्यानमालेच्या प्रवासावर टाकण्यात आलेला हा प्रकाशझोत...
|
|
|
|
- ऋचा गोडबोले
कुठेही उभारलेल्या चार भिंती आणि छपरांच्या मांडणीच्या झोपड्यांत अनेक माणसांची कुटुंबं राहतात. एकटीदुकटी माणसं क्वचितच. आपण वाहनातून जाताना दिसणारी ही घरं, दिवसा त्यांना दारंच दिसत नाहीत. त्यांत ती सर्व राहतात, वावरतात. दारं-खिडक्या नसल्या तरी लोकांची ती घरंच असतात. आपण काही फार वेळ आत डोकावत नाही. त्यामुळे दिवसा, आपण चल असतानाची क्षणचित्रं ग्राह्य धरली तर मुख्यत्वानं लक्षात येतं, की ती घरं किती रिकामी असतात!
|
|
|
|
|
डॉ.अनिलकुमार भाटे

आस्तिक माणसे देव मानतात. नास्तिक देव मानत नाहीत. पण तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, देव ही अत्यंत मूलभूत अशी संकल्पना जगातल्या सर्व लोकांच्या मनामधे खोलवर पोचलेली आहे हे प्राथमिक सत्य आहे. तुम्ही ठार नास्तिक असलात आणि देव मानत नाही असे निक्षून सांगत असलात, तर ‘तूम्ही काय मानत नाही म्हणालात?’ अशा प्रश्नाचे उत्तर देण्याकरता तरी निदान तुम्हाला देव ही संकल्पना मनात आणावीच लागेल. अनिल भाटे यांनी देव, अध्यात्म आणि आस्तिकता या गोष्टींचा केलेला हा उहापोह...
|
|
|
|
- श्रीकांत टिळक
 संगीताबद्दलच्या आवडीतून प्रकाश कामत यांनी जुनी गाणी ध्वनिमुद्रित करण्यास सुरूवात केली. हा छंदाचा प्रवास रेकॉडर्सकडे वळला आणि त्यातून निर्माण झाला तीन हजाराहून अधिक रेकॉडर्स आणि सुमारे अडीज हजार कॅसेटचा खजिना. समृध्द संग्रहाचा आनंद इतरांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी कार्यक्रमही सुरू केले. त्यांच्या अनोख्या छंदाची दखल घेत 2001 साली ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्डस्’ने त्यांचे नाव विक्रमांच्या यादीत समाविष्ट केले
|
|
|
|
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्लेख आला असून त्यांनी या भाषेचा भिल्लांची भाषा म्हणून उल्लेख केला आहे.
|
|
|
|
समाजाच्या दोन बाजू दाखवणारे अनुभव एकाच आठवड्यात आले. आपण कोणत्या बाजूचे हा सद्यकालात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की सकारात्मक प्रयत्न सुरू केली, तर तिला सकारात्मक प्रतिसाद येतो. सध्या सर्वत्र बकाल गोष्टी प्रसृत करण्याकडे कल दिसत असताना समाजात घडणा-या सकारात्मक घटना-विचारांना प्राधान्याने स्थान द्यायचे आणि त्याद्वारे समाजधारणेला गती द्यायची, हा ‘थिंक महाराष्ट्र’चा संकल्प आहे. नव्या वर्षात त्याला दुजोरा देत आहोत.
|
|
|
|